Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Friday, November 13, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



 सोलापूर महानगरपालिका कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने SRPF बल गट क्र 10 चे मुख्य समादेशक डॉ. दिपाली काळे यांचा सत्कार.. 


सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहर माजी पोलीस उपायुक्त (स्पेशल क्राईम ब्रांच) तथा सोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १० च्या मुख्य समादेशक मा. डॉ. दिपाली प्रमोद काळे मॅडम यांचा गुरुवारी सत्कार करण्यात आला.


दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सोरेगाव SRPF कॅम्प एरियातील कार्यालयामध्ये हा सत्कार सोहळा पार पडला. सोलापूर महानगरपालिका कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने हा सत्कार आयोजित करण्यात आला होता.



यावेळी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु सर आणि एमपीडब्ल्यू मोईन शेख यांनी दिवाळी निमित्ताने सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन डॉ. दिपाली काळे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.


पोलीस दल आणि आरोग्य विभाग यांच्यातील समन्वयातून नागरिकांना अधिक चांगली सेवा देता येते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी डॉ. काळे मॅडम यांच्या कार्याचे कौतुक केले.




No comments:

Post a Comment