सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूरकरांसाठी खुशखबर.!
आंतरराष्ट्रीय वक्त्या शिवानी दीदी १९ नोव्हेंबरला येणार सोलापुरात;
'सरल मन सरल जीवन'वर करणार मार्गदर्शन..
सोलापूर (प्रतिनिधी) :-
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सोलापूर यांच्या वतीने 'सरल मन सरल जीवन' या विषयावर आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्त्या आणि राजयोग शिक्षिका बी. के. शिवानी दीदी यांचे मुख्य प्रवचन गुरूवार दि. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.
या संदर्भात बी. के. प्रदीपभाई शिंगवी, बी. के. प्रज्ञादीदी, बी. के. अनितादीदी, डॉ. नंदा भट्ट यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
मनाला शांती, जीवनाला समृद्धी बनवण्यासाठी अध्यात्माची गरज निर्माण झालेली असताना योग्य व्यासपीठ आणि मार्ग मिळत नाही, हे ओळखून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या धावपळीच्या जगात ताणतणाव वाढत असताना प्रत्येक मनुष्याला मनःशांती, जीवन आनंदी ठेवण्यासाठी आणि समाधानासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमामध्ये बी. के. शिवानी दीदी सहभागी होऊन उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. मनातील नकारात्मक विचारांवर मात करून शांत, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा त्यांच्या मार्गदर्शनातून मिळणार आहे.
मनःशांती, तणावमुक्त जीवन, सकारात्मक विचार, भावनिक बुद्धिमत्ता, स्व व्यवस्थापन, नातेसंबंधातील सुसंवाद, कर्मसिद्धांत, आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि आत्मपरिवर्तन अशा विविध विषयांवर त्या आध्यात्मिक प्रेरणादायी मार्गदर्शन करणार आहेत.
वेळ आणि प्रवेश :
हा कार्यक्रम गुरुवार दि. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री ८ या वेळेत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमासाठी नोंदणी आवश्यक असून नोंदणी झाली नसली तरी सर्वांसाठी हा कार्यक्रम मोफत ठेवण्यात आला आहे.
नोंदणीसाठी www.omshanti.in/solapur या संकेतस्थळावर पूर्वनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ८६६९१६३२७२ किंवा ७७७४८९८८७७ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी बी. के. पूनमदीदी, बी. के. शिवराजभाई मजगे उपस्थित होते.
मेडिटेशनसाठी तीन दिवसीय शिबीर
दि. २०, २१ आणि २२ नोव्हेंबर २०२६ या तीन दिवशी सकाळी ७ ते ८ आणि सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत शिवछत्रपती रंगभवन या ठिकाणी मेडिटेशनचा जादुई प्रभाव हे तीन दिवसीय शिबीर घेण्यात येणार आहे. यामध्ये बी. के. डॉ. दामिनीदिदी मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरालाही सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.



No comments:
Post a Comment