Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Friday, November 13, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 


 निरंजन बोध्दूल यांना मारहाण प्रकरणी शिवसेना आक्रमक.!

मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; बोध्दूल यांच्यावरील कथित खोटा अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा रद्द करा – पोलीस आयुक्तांकडे निवेदन

सोलापूर :- सोलापूरचे शिवसेना पदाधिकारी निरंजन बोध्दूल यांना झालेल्या मारहाण प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. बोध्दूल यांना मारहाण करणाऱ्या संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करावा, अशी जोरदार मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात शिवसेनेने गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना पदाधिकारी निरंजन बोध्दूल यांच्यावर हल्ला झालेला असतानाही संबंधित आरोपींना अटक करण्याऐवजी बोध्दूल यांच्यावरच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. हा गुन्हा खोटा असल्याचे सांगत तो तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिवसेना ही जात-पात न मानणारी संघटना असून, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हीच आमची भूमिका आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हा गंभीर विषय असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर शासन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पत्रकाराला मारहाण आणि त्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे सोलापूरच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 शिवसेनेचा प्रशासनाला थेट सवाल!

पत्रकार निरंजन बोध्दूल यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई कधी?

मारहाणीच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का?

निरंजन बोध्दूल यांच्यावरील कथित खोट्या गुन्ह्याची सत्यता तपासणार का?

दोषींना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे का?

 मारहाण करणाऱ्यांना अभय आणि मार खाणाऱ्यांवर गुन्हे? हा कोणता न्याय?

निरंजन बोध्दूल यांना न्याय मिळालाच पाहिजे!

निवेदनातील मागणी : संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून बोध्दूल यांच्यावरील कथित खोटा गुन्हा रद्द करावा.

याप्रसंगी प्रताप चव्हाण जिल्हाप्रमुख,महेश धाराशिवकर महानगर प्रमुख, शरणराज केंगनाळकर जिल्हाप्रमुख, विष्णू कारमपुरी उपजिल्हाप्रमुख,राजाभाऊ कुसेकर शहरप्रमुख,सुरेश जगताप शहरप्रमुख

 राम वाकसे युवा जिल्हा प्रमुख,तुषार आवताडे युवा सेना, बबलू पंडीत,गणेश व्हटकर आदि शिवसैनिक मोठ्या संख्याने उपस्थिती होते

No comments:

Post a Comment