Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, November 18, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



सोलापूर महापालिकेच्या इलेक्ट्रिक ई-बस सेवेत महिलांना ५० टक्के प्राधान्य द्या!

वाहक (कंडक्टर) पदांच्या भरतीत महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांची मागणी


सोलापूर : सोलापूर शहरात सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक ई-बस सेवेमध्ये वाहक (कंडक्टर) पदावर महिलांना ५० टक्के प्राधान्य देऊन त्यांना रोजगाराची समान संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे.

शहरातील नागरिकांना आधुनिक, सुरक्षित, सुलभ व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलापूर महानगरपालिकेमार्फत इलेक्ट्रिक ई-बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होणार असून नागरिकांना चांगली सुविधा मिळणार आहे.

उपमहापौर देवकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, इलेक्ट्रिक ई-बस सेवेच्या संचालनासाठी वाहक पदावर नियुक्ती करताना महिलांचा सहभाग वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि महिलांना रोजगाराच्या समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ई-बस सेवेतील वाहक पदांच्या एकूण जागांपैकी ५० टक्के पदांवर महिलांना प्राधान्य देण्यात यावे.


महिला आज विविध क्षेत्रांमध्ये सक्षमपणे आणि जबाबदारीने काम करत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्येही त्या उत्तम प्रकारे आपली जबाबदारी पार पाडू शकतात. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेल्या इलेक्ट्रिक ई-बस सेवेत महिलांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे ही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


तसेच, ई-बस सेवेमधील वाहक पदांच्या एकूण नियुक्त्यांमध्ये ५० टक्के महिलांना प्राधान्य देण्याबाबत आवश्यक धोरणात्मक निर्णय घ्यावा. संबंधित विभागाला आवश्यक सूचना व निर्देश देऊन महिला उमेदवारांना नियुक्ती प्रक्रियेत प्राधान्य देण्यात यावे आणि याबाबत तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणीही उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी केली आहे.


महिलांना रोजगाराची संधी, स्वावलंबनाला बळ आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत समान सहभाग मिळावा, या उद्देशाने उपमहापौरांनी घेतलेली ही भूमिका महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.सोलापूर शहरात सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक ई-बस सेवेमध्ये वाहक (कंडक्टर) पदावर महिलांना ५० टक्के प्राधान्य देऊन त्यांना रोजगाराची समान संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे.

शहरातील नागरिकांना आधुनिक, सुरक्षित, सुलभ व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलापूर महानगरपालिकेमार्फत इलेक्ट्रिक ई-बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होणार असून नागरिकांना चांगली सुविधा मिळणार आहे.

उपमहापौर देवकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, इलेक्ट्रिक ई-बस सेवेच्या संचालनासाठी वाहक पदावर नियुक्ती करताना महिलांचा सहभाग वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि महिलांना रोजगाराच्या समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ई-बस सेवेतील वाहक पदांच्या एकूण जागांपैकी ५० टक्के पदांवर महिलांना प्राधान्य देण्यात यावे.


महिला आज विविध क्षेत्रांमध्ये सक्षमपणे आणि जबाबदारीने काम करत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्येही त्या उत्तम प्रकारे आपली जबाबदारी पार पाडू शकतात. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेल्या इलेक्ट्रिक ई-बस सेवेत महिलांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे ही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


तसेच, ई-बस सेवेमधील वाहक पदांच्या एकूण नियुक्त्यांमध्ये ५० टक्के महिलांना प्राधान्य देण्याबाबत आवश्यक धोरणात्मक निर्णय घ्यावा. संबंधित विभागाला आवश्यक सूचना व निर्देश देऊन महिला उमेदवारांना नियुक्ती प्रक्रियेत प्राधान्य देण्यात यावे आणि याबाबत तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणीही उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी केली आहे.


महिलांना रोजगाराची संधी, स्वावलंबनाला बळ आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत समान सहभाग मिळावा, या उद्देशाने उपमहापौरांनी घेतलेली ही भूमिका महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.




No comments:

Post a Comment