Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, February 1, 2023

सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सोलापुर शहरातील संपुर्ण जड वाहतुक बंद , जड वाहतुकीची समस्या कायमची बंद होणार,


31 जानेवारी 2023 
सोलापूर (प्रतिनिधी) : जड वाहतुकीस सोलापुरातील युवाशक्तीने मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी जनतेचे हित लक्षात घेऊन आज मंगळवारी पोलीस आयुक्त कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली. त्यात अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले. निष्पापांचे बळी घेणाऱ्या जड वाहतुकीस ब्रेक लागल्याची भावना सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाप्रशासन,पोलिस,प्रशासन,म.न.पा,प्रशासन,वाहतुक शाखा,NHAI,PWD,आदी आधिकारी वर्गासमवेत अपघात आणि जडवाहतूकी संदर्भात दुसरी महत्वाची बैठक पोलिस आयुक्तालय येथे पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी बोलावली होती. या बैठकीस जड वाहतूक बंद करण्यासाठी आक्रमकतेने भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते राज सलगर यांच्यासह अन्य सामाजिक संघटनेचे प्रमुख उपस्थित होते.
आजच्या बैठकीतील मुख्य मुद्दे…
१. सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सोलापुर शहरातील संपुर्ण जड वाहतुक बंद
२. रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जड वाहतुकीस परवानगी.
१. सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सोलापुर शहरातील संपुर्ण जड वाहतुक बंद
२. रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जड वाहतुकीस परवानगी.
३.जुना पुना नाका ते निराळे वस्ती येथून जड वाहतुक कायम स्वरूपी बंद. सदर ठिकाणी मनपा आणि पोलिस प्रशासन आणि वाहतुक प्रशासनांतर्गत हाईट ब्रेकर बसवण्यात येणार.
४. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जुना पुना नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व्हाया आण्णाभाऊ साठे चौक येथील जड वाहतुक बंद.
५.सोलापुर शहरातील माल उतरविण्यासाठी येणाऱ्या माल वाहतुकीस शिथिल असलेली दुपारी १.०० ते सायं.४.०० पर्यंतची अट रद्द.
६. शहरामध्ये जड वाहतुकीमुळे होणारे अपघात टाळणेसाठी जड वाहतुकीस २० किमी प्रति तास वेग मर्यादा.
७. अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या वाहनास परवानगी.
८. शहरातील १९ सिग्नल पैकी ७ चालू सिग्नल व्यतिरिक्त बंद असलेले सिग्नल चालू करण्याचे आदेश.
९.ऊस वाहतुक ट्रॅक्टरसाठी 1 ट्रॉलीचे निर्बंध.
१०) अत्यावश्यक नावाखाली दिलेले परवाने रद्द
११) शहरात तीन ठिकाणी ‘हाईट ब्रेकर’
१०. वरील सर्व निर्बंध दि.१ फेब्रु २०२३ पासुन लागू करण्यात येण्याची शक्यता
जड वाहतुकीच्या विरोधात सोलापूर शहरातील युवकांनी एकजूट केली होती. निष्पाप बळी रोखण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यास यश मिळाले आहे.

No comments:

Post a Comment