सारा न्यूज नेटवर्क -
वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांना
सुप्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री सिद्धूरेड्डी कंदकटला यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप..
सोनू सूद चॅरिटी फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सौ.सरस्वती लक्ष्मण काळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सूद चॅरिटी फाउंडेशन वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कूल,मोहोळ या ठिकाणी आज दिनांक 30 ऑगस्ट 2014 दुपारी 1 वाजता हैदराबाद तेलंगणा येथील सुप्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री सिद्धू रेड्डी कंदकटला व त्याचबरोबर तेलगू सिनेअभिनेता इंद्रसेना बुद्धम यांनी शाळेला भेट दिली.
त्यांचे शाळेमध्ये आगमन होताच लंबोदर ढोल ताशा पथक सोलापूर येथील सर्व मुलांनी त्यांचे स्वागत ढोल ताशाच्या गजरात अगदी आनंदाने केले व श्री सिद्धू रेड्डी सर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे हार घालून स्वागत सूद चॅरिटी फाउंडेशनचे मेंबर श्री.विपुल मिरजकर सर व वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कूलचे सचिव श्री.विशाल काळे सर तसेच अध्यक्ष श्री.आदिनाथ काळे सर यांनी केले.शाळेतील सर्व मुलांनी टाळ्यांच्या गजरामध्ये ही त्यांचे स्वागत केले व सर्वजण स्थानापन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे मॅडम यांनी केले.
सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले व आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना श्री.सिद्धू रेड्डी सर यांच्यातर्फे वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कुल, येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले व सिद्धूरेड्डी कंदकटला व तेलुगू चित्रपट अभिनेते इंद्रसेना बुद्धम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी इको नेचर क्लबचे पर्यावरण दुत डॉ मनोज देवकर यांनी सहकार्य केले. त्यांचा सत्कार सिद्धूरेड्डी कंदकटला यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रसिद्ध चित्रकार विपुल मिरजकर यांनी साकारलेली कलाकृतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
तेलगु सिने अभिनेते इंद्रसेना यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व मुलांना खुश केले व त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सिद्धू रेड्डी सर यांनी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यामध्ये ते म्हणाले की "100 करोड कमाना आसान है पर लोगों के दिल में अपने लिये जगह बनाना बहुत मुश्किल है.." म्हणूनच लोकांवर असलेल्या प्रेमापोटी ते समाजसेवा करतात असे त्यांनी सांगितले व यापुढेही असे समाजसेवा करत राहणार असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच वैष्णवी स्कूल साठी 51 बेंचेस व एक प्रोजेक्टर देणार असेही आवाहन केले. त्यानंतर विश्वविक्रमवीर व सोनू चॅरिटी क्लब व चित्रकार विपुल मिरजकर यांनी साकारलेल्या कलाकृतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर संस्थेचे सचिव श्री विशाल काळे सर यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाचे सांगता केली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment