Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, October 29, 2024

सोलापूर शहर मध्य मधून सादिक शेख यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज..


 सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर शहर मध्य मधून सादिक शेख यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज.. 

 पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख निवडणुकीच्या रिंगणात. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वातावरण सुरू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी महायुती व तिसरी आघाडी म्हणून अनेक दिग्गज नेते आपले उमेदवारी अर्ज भरत आहे त्याचप्रमाणे सोलापूर शहरात देखील विधानसभेच्या या रणभूमीत विविध राजकीय पक्षांचे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. 

येथील लोकप्रिय साप्ताहिक "यशसंघर्ष" व "सोलापूर नामा 24 न्यूज" चॅनेल च्या माध्यमातून सर्वसामान्य तसेच वंचित पिढीत घटकाच्या न्याय हक्कासाठी नेहमीच प्रयत्न करणारे साप्ताहिक यशसंघर्ष चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला.

 शहर मध्य मधून सादिक शेख यांनी अपक्ष उमेदवारी चा अर्ज दाखल केला आहे.

 सोलापूर शहरातील गेल्या अनेक वर्षापासून जनसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता सादिक यांनी अनेक वेळा प्रयत्न केला आहे 

 आमच्या प्रतिनिधीशी बोलताना  सादिक शेख सांगितले की , यांनी  या निवडणुकीत शहर मध्यच्या जनतेच्या न्याय हितासाठी शिक्षण, आरोग्य, महिला सुरक्षेबरोबरच या भागातील विकासाच्या मुद्द्यावर लढणार अशी माहिती दिली आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 





No comments:

Post a Comment