सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकार कृती समिती व आप्पाश्री मित्रपरिवाराच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा वाढदिवसानिमित्त सत्कार.
सोलापूर (प्रतिनिधी) :- दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद बागेतील प्रांगणात पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
यामध्ये सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटी को-ऑपरेटिव्ह फेडरेशन संस्थेचे संचालक अभिराज भैया शिंदे, दूर्वांकुर साप्ताहिकाचे संपादक वैभव धोत्रे आणि युवा पत्रकार प्रसाद ठक्का या मान्यवरांचा शाल, टोपी, पुष्पहार घालून तसेच पेढे भरवून सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.
सत्कारानंतर तिन्ही मान्यवरांनी आयोजक पत्रकार कृती समिती व अप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार यांचे मनःपूर्वक आभार मानले. पत्रकार कृती समिती समिती व आप्पाश्री लंगोटे मित्रपरिवाराकडून दरवर्षी विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा वाढदिवसानिमित्त गौरव केला जातो,अशी माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमास पत्रकार कृती समितीचे उपाध्यक्ष तथा अप्पाश्री लंगोटे मित्रपरिवाराचे सर्वेसर्वा आप्पासाहेब लंगोटे, दैनिक जय हो चे संपादक विजयकुमार उघडे, एमडी न्यूज चे संपादक सैपन शेख, युनूस आत्तार,भीमशक्ती मिलिंद (नाना) प्रक्षाळे, लतीफ नदाफ, डी.डी पांढरे,अकबर शेख,रामा हुडांरे, सिद्धार्थ भडकुंबे, विलास सरवदे,सुदर्शन सलगर,अस्लम नदाफ, ईसुब पिरजादे,
शांतीसागर सरवदे, सतीश धोत्रे, रोहित खिलारे, पप्पू गायकवाड, ओंकार धोत्रे, श्याम कोळी, लक्ष्मण खाडे, निलेश मस्के, रवी रणवीर, मुद्गल.आदी मान्यवर उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे






No comments:
Post a Comment