Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, August 27, 2025

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

सेवा फाउंडेशनच्या वतीने यंदा "माझा गणपती स्पर्धेचे" आयोजन...

घरगुती आणि सार्वजनिक गणपतीच्या सुंदर देखाव्यासाठी आकर्षक बक्षीसे...


सोलापूर(प्रतिनिधी) :-  सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी सहाय्यक आयुक्त श्री प्रकाशभाऊ राठोड यांच्या वतीने यंदा "माझा गणपती स्पर्धा २०२५" आयोजित करण्यात आली आहे. शहरातील घरगुती तसेच सार्वजनिक मंडळाकरिता सदर स्पर्धा आयोजित केली असून पर्यावरण पूरक, शासनाच्या निर्देशानुसार,  उत्तम सजावट, सामाजिक संदेश देणारे देखावे,  प्रदूषणमुक्त तसेच  लेझर लाईट न लावणाऱ्या करिता स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत उत्तम देखावे असणाऱ्यांचे पारितोषिकासाठी निवड केली जाणार आहे. निवडलेल्या मंडळाकरिता मोठे आकर्षक बक्षीस , ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या घरगुती गणपती पैकी लॉटरी पद्धतीने २५ उत्तम देखावा सादर केलेल्याची निवड करून बक्षीस ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.


             तरी या स्पर्धेत बहुसंख्येने सहभागी व्हावेत असे आवाहन सेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे. आज पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून दोन दिवसांत नोंदणी करून सेवा फाउंडेशन टीमच्या वतीने घरगुती तसेच सार्वजनिक मंडळाला भेटी देऊन सर्वे केला जाणार आहे सर्वेतून उत्तम गणपतीची निवड केली जाणार आहे. नोंदणी करिता संपर्क करा. 9764178058 / 9146055030

              पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम शनिवार दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते  ३ च्या दरम्यान सुंदरम मल्टीपर्पज हॉल, नेहरूनगर, विजापूर रोड सोलापूर येथे करण्यात येणार असून, यावेळी अनेक नेते व अधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. तसेच या बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत. तरी घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडळाने याचा आनंद घ्यावा अशी माहिती सेवा फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे


No comments:

Post a Comment