सारा न्यूज नेटवर्क -
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनात सातत्य-माजी आयुक्त राजेंद्र भोसले यांचे मनोगत.
अक्कलकोट (प्रतिनिधी):- अक्कलकोट येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पुणे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त आयुक्त तथा भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी (IAS) आणि सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे सहकुटुंब देवस्थानास भेट देण्यासाठी आले होते.
दर्शनानंतर व्यक्त केलेल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, अनेक वर्षांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन लाभले. हे दर्शन माझ्या व कुटुंबासाठी संस्मरणीय ठरले आहे. श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र मिळणे ही आमच्यासाठी विशेष बाब आहे. एकंदरीत देवस्थान समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनात पुर्वीसारखेच सातत्य असून मंदिरातील शिस्त, स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण स्तुत्य आहे.”
याप्रसंगी देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी माजी आयुक्त राजेंद्र भोसले यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.
कार्यक्रमाला तहसीलदार विनायक मगर, तलाठी सुहास डोईफोडे, देवस्थान सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी तसेच पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment