सारा न्यूज नेटवर्क -
सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष माजी सहाय्यक आयुक्त श्री.प्रकाश राठोड - डॉ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित...
सोलापूर(प्रतिनिधी) :- रविवार दि.२८ जुलै २०२५ रोजी ड्रीम फाउंडेशन सोलापूर आयोजित, भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या १० व्या पुण्यस्मरणा निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष माजी सहाय्यक आयुक्त श्री.प्रकाश राठोड यांच्या सामाजिक कार्याचा दखल घेत त्यांना यंदाचा डॉ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले, त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री प्रकाश राठोड हे प्रतापनगर तांड्याचे सुपुत्र असून भिवंडी महापालिकेत २१ वर्षे शासकीय सेवेत कार्यरत होते. ते सहाय्यक आयुक्त पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेऊन समाज सेवेसाठी पूर्ण वेळ देत आहेत. मागील सहा महिन्यांपासून ते सोलापुरातील सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मोठ्या स्वरूपात काम सुरू केले आहे. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी कुबेर चेंबर इचगीरी मठ सोलापूर येथे संपर्क कार्यालय सुरू केले आहेत. रोड, रस्ते, पाणी, लाईट, गटार या मूलभूत सुविधेचा अभाव असेल तर तात्काळ महापालिकेच्या माध्यमातून ते करून घेणे, असोत किंवा सरकारी योजनेसाठी मोफत ऑनलाईन कागदपत्रे काढून देणे अशा कामामुळे सामाजिक तळमळीचे नेतृत्व म्हणून ते सध्या सोलापुरात खूप चर्चेत आहेत. म्हणूनच त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ड्रीम फाउंडेशन च्या वतीने आज त्यांना डॉ.कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वरिष्ठ वैज्ञानिक मा.डॉ.अशोक नगरकर , मा.श्री.वेंकटेश गंभीर , सोलापूरचे पोलीस अधीक्षक मा.श्री.अतुल कुलकर्णी , म्हाडाचे विविध नियंत्रक मा.श्री.अजयसिंह पवार , प्रा.वी.एस. अंकलकोठे-पाटील पुणे, मा.श्री.नितीन जाधव संस्थापक अनअकॅडमी आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजक मा.श्री.काशिनाथ भतगुणकी सर, (अध्यक्ष ड्रिम फाउंडेशन) मा.श्री.डॉ.गणेश इरकल (संचालक केरळा थेरपी सेंटर ), शेखर वाघमारे (सेंटर हेड ॲकॅडमी सोलापूर) उद्योजक श्री.नितीन वेदपाठक, श्री.शिवानंद हत्तुरे , श्री.वैभव सोनटक्के हे होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment