सारा न्यूज नेटवर्क -
यशवंत फडतरे यांचा पत्रकार कृती समिती व आप्पाश्री लंगोटे मित्र परिवारातर्फे सत्कार..
सोलापूर (प्रतिनिधी) :- वंचित, शोषित घटकांसाठी अहोरात्र झटणारे आणि प्रसंगी त्यांना न्याय मिळवून देणारे यशवंत बाबुराव फडतरे यांची महाराष्ट्र राज्य शासन नियुक्त अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण परिषदेवर शेतकरी प्रवर्गातून अशासकीय सदस्य म्हणून तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिवांच्या आदेशान्वये ही नियुक्ती झाल्याने सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
पत्रकार कृती समिती आणि आप्पाश्री लंगोटे मित्र परिवार यांच्या वतीने फडतरे यांचा शाल, टोपी व मिठाई भरून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित पत्रकार बांधव व मान्यवरांना संबोधित करताना यशवंत फडतरे म्हणाले की, “निश्चितच मी आपल्या सर्व सहकारी पत्रकार बांधवांच्या सहकार्याने वंचित, शोषित व पीडित घटकांसाठी मोठ्या जोमाने कार्यरत राहीन. आपल्या शुभेच्छा व सहकार्य माझ्या पाठीशी असावे.”
या कार्यक्रमाला आप्पाश्री मित्र परिवाराचे सर्वेसर्वा आप्पाश्री लंगोटे, नितीन करजोळे,
सिद्धार्थ भडकुंबे,बिपिन करजोळे, ज्येष्ठ पत्रकार इकबाल शेख, सैपन शेख,राम हुंडारे, गिरमल्ला गुरव, नरेंन कांबळे,विजय चोळ्ळे,मनोज राठोड,डांगे सर.......
आदींसह पत्रकार कृती समितीचे सर्व सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment