सारा न्यूज नेटवर्क -
पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांचा आप्पाश्री मित्र परिवाराच्यावतीने सत्कार संपन्न..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर ग्रामीण पोलीस विभागातील कर्तव्यनिष्ठ पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांचा वाढदिवसानिमित्त आप्पाश्री मित्र परिवार आणि पत्रकार बांधव यांच्या वतीने टोपी, शाल व पुष्पहार घालून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास पत्रकार कृती समितीचे आप्पासाहेब लंगोटे, मिलिंद (नाना) प्रक्षाळे, लतीफ नदाफ, विजयकुमार उघडे, अकबर शेख, युनूस अत्तार, अस्लम नदाफ, सिद्धार्थ भडकुंबे, राम हुंडारे, साहेबराव (नाना) प्रक्षाळे, सैफन शेख यांच्यासह आप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य आणि पत्रकार कृती समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी पीआय उस्मान शेख यांनी आपल्या भावना व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे



No comments:
Post a Comment