सारा न्यूज नेटवर्क -
संस्कार संजीवनी फाउंडेशनचा उपक्रम : आश्रमातील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप.
सोलापूर (प्रतिनिधी) :- उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर येथे संस्कार संजीवनी फाउंडेशन संचालित वंचित विद्यार्थी आश्रमामध्ये विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे उद्घाटन उळे गावचे उपसरपंच व सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. नेताजी भाऊ खंडागळे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. परमेश्वर काळे सर, सौ. काळे मॅडम, प्रवीण कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमामुळे आश्रमातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळणार असून संस्थेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment