Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, August 20, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशालेस तीन पदके.. 

 

सोलापूर(प्रतिनिधी) : - एस.आर.पी.एफ. मैदान, सोरेगाव येथे शनिवार दि.16 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर शहर-जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते...

 या स्पर्धेत एमआयडीसी भागातील स्वामी विवेकानंद प्रशालेचती न पदकांची कमाई केली. 

यामध्ये #14 वर्षाखालील वयोगटात प्रवीण घोडके याने ट्रायथलाॅन या क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावले,

# 16 वर्षाखालील वयोगटात सुप्रिया कोळी हिने भालाफेक क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकावले तर #18 वर्षाखालील वयोगटात राहुल बोलाबत्तीन याने भालाफेक क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकावले...


14 वर्षाखालील वयोगटातील प्रवीण घोडके याची बालेवाडी, पुणे येथे दि.2 ते 5 सप्टेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या *राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे...

 या सर्व खेळाडूंचे नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार मा.प्रकाशजी यलगुलवार, उपाध्यक्ष मा.अनुगीता पवार,सहसेक्रेटरी मा.शशीभूषण यलगुलवार, सहसेक्रेटरी मा.सीमा श्रीगोंदेकर, कार्यकारणी सदस्य मा.हार्दिक निमाणी , मुख्याध्यापक मा.डॉ.हणमंत नारायणकर यांनी अभिनंदन केले...

या खेळाडूंना क्रीडा शिक्षक मा.सुभाष माने, मा.गणपती कोळी व मा.खंडू शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले...

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment