Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, August 4, 2025

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 आयुर्वेदिक वनस्पती दिनानिमित्त आयुर्वेदिक रोपांचा वाटप.. 

श्री आचार्य गुरु बाळकृष्ण यांच्या वाढदिवसानिमित्त औषधी वन दिवस साजरा 

 सोलापूर (प्रतिनिधी) :- चार ऑगस्ट पतंजली योग समितीच्या माध्यमातून श्री आचार्य गुरु बाळकृष्ण यांच्या वाढदिवसानिमित्त औषधी वन दिवस साजरा केला जातो त्याच्या अनुषंगाने पतंजली योग समितीच्या माध्यमातून औषधी वनस्पतीचे वाटप करण्यात आले. 


शुभराय मठ येथे होमहवन व औषधी वनस्पती वाटप करण्यात आले उपस्थितीत महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष सुधाताई आळ्ळीमोरे .संगीता ताई जाधव, नीलिमा शितोळे  शास्त्री सौ.सुतारताई, व पतंजली योग समितीच्या सर्व सदस्या उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षामध्ये पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर यांच्या विशेष सहकार्यामुळे ही १०१ औषधी वनस्पती उपलब्ध करून  योग समितीला देण्यात आले हा सप्ताह वृक्ष लागवड व वृक्ष वाटप म्हणून करण्यात येणार आहे सोलापुरात विविध ठिकाणी औषधी वृक्षांची लागवड होणार आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे





No comments:

Post a Comment