सारा न्यूज नेटवर्क -
सोरेगाव, जिल्हा परिषद शाळेच्या लोकवर्गणीतून निर्माण करण्यात येणाऱ्या नवीन डिजिटल शाळेचे भूमिपूजन माजी सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकवर्गणीतून नवीन डिजिटल मॉडेल शाळा निर्माण करणारे पहिले सोरेगाव - माजी सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाने सोरेगावाचा आदर्श घेऊन लोकवर्गणीतून सरकारी शाळेचा काम करता येईल....मा. सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून आदर्श शाळा म्हणून पुरस्कार प्राप्त सोरेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने काल विविध उपक्रम राबविण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ, पालक विद्यार्थी यांच्या सहकार्याच्या माध्यमातून सोरेगाव शाळेचा नावलौकिक वाढवून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एक सर्वोत्कृष्ट आदर्श शाळा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून लोकसहभाग आणि सीआरएस फंडाच्या माध्यमातून नवीन डिजिटल शाळेचा विकास करण्यात येत आहे. यावेळी नवीन शाळेच्या कामाचे भूमिपूजन सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी सहाय्यक आयुक्त श्री प्रकाश राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.
शाळेत स्टेज नूतनीकरण करणे, पेव्हर ब्लॉक बसवणे, डिजिटल प्रयोगशाळा, डायनिंग हॉल निर्माण करणे, वॉल कंपाऊंड बांधणे नवीन डिजिटल मॉडेल शाळा या विकास कामाचा शुभारंभ कालच्या भूमिपूजनाने झाला. त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम देखील तेवढ्याच उत्साहाने पार पडला यावेळी माझी सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड बोलताना म्हणाले की मी भिवंडी महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असताना माझ्याकडे शिक्षण विभागाचा कार्यभार होता.
त्यावेळेस मी शासनाच्या भरोशावर किंवा सरकारी निधीवर अवलंबून न राहता स्थानिक आमदार यांच्या सहकार्याने एक उपक्रम हाती घेतलं ते म्हणजे लोकांच्या सहभागातून लोक वर्गणीतून एक मॉडेल शाळा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली. ती मॉडेल शाळा सर्व सोयीसुविधाने युक्त असलेली डिजिटल शाळा आहे. ज्यामध्ये संगणक कक्ष, डिजिटल प्रयोगशाळा, ग्रंथालय, बाग बगीचा, बोलक्या भिंती अशा गोष्टींचा समावेश आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर राष्ट्रभक्ती आणि राष्ट्र उभारणीमध्ये विद्यार्थ्यांचा योगदान या विषयावर देखील ते बोलले.
यावेळी श्री सूरज पाटील कन्वेंशिंग एजंट,मार्केट यार्ड यांचे शुभहस्ते* श्री सिद्धाराम कोणदे,श्री यशवंत बिराजदार,श्री राजशेखर पाटील,सौ.सोनालीताई कांबळे अध्यक्ष, मा श्री चंद्रकांत खडाखडे,मा.श्री राजशेखर पाटील, मा.श्री विजयकुमार स्वामी,शिक्षणतज्ञ,श्री लक्ष्मण सुतार सदस्य,सौ रोकडेताई सदस्य,सौ गायकवाडताई सदस्य, सौ.सारिकाताई देशमुख,श्री मधुकर कांबळे,सौ वाघमारे ताई,श्री नागसेन ड़ूरके,श्री संदीप कोळी,मा श्री नागेश मग्रूमखाने, सौ वाघमारे ताई, श्री गुरूपवार, तलाठी भाऊसाहेब, श्री जेउरे सर सर्व शिक्षक, ग्रामस्थ व पालक यांची उपस्थिती होती.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे



No comments:
Post a Comment