सारा न्यूज नेटवर्क -
स्वामी विवेकानंद प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पारंपारिक खेळाचे आयोजन
---------------------------------------------
सोलापूर(प्रतिनिधी) :- नॅब संचलित *स्वामी विवेकानंद प्रशाला* एमआयडीसी सोलापूर येथे " *राष्ट्रीय क्रीडा दिन* " उत्साहात साजरा करण्यात आला. तीन दिवसाच्या या कार्यक्रमांमध्ये विविध *पारंपारिक* व *कबड्डी,खो-खो, हॉलीबॉल* या खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे *मुख्याध्यापक डॉ. हणमंत नारायणकर सर, श्री. माने सर* उपस्थित होते. प्रारंभी *मेजर ध्यानचंद* यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. तीन दिवशीय खेळामध्ये स्पर्धेमध्ये *पारंपारिक खेळ जसे
जिबळ्या,लंगडी,गोटया,भवरा,अट्यापाट्या, लागोरी* या खेळांचा समावेश केलेला आहे. तसेच *कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल* या क्रीडा स्पर्धांचा देखील समावेश यामध्ये केलेला आहे. प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात *राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यामागील उद्देश, क्रीडा क्षेत्रातील संधी, खेळाचे महत्व* याविषयी आपले मत मांडले.
याप्रसंगी *कबड्डी,खो-खो, गोळा फेक, थाळीफेक, हॉलीबॉल* या मैदानाचे आखणी करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेतील सहशिक्षक श्री *सपताळे सर, श्री राठोड सर, श्री कोळी सर, निलंगीकर मॅडम, हिंगमिरे मॅडम* उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार *श्री शिंदे सर* यांनी मांनले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment