Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, August 2, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

संभाजी ब्रिगेडच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 


सोलापूर (प्रतिनिधी) :- संभाजी ब्रिगेड च्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या 105 वी जयंती निमित्त भैय्या चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

एक ऑगस्ट हाच खरा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात यावा तसेच थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने शासनाकडे केली आहे. 


लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे समाजातील शोषित, पीडित, कामगार, भटक्या-विमुक्त समाजाचे खरे शब्दसैनिक होते. त्यांनी "फकिरा" सारख्या साहित्यिक कादंबऱ्यांमधून क्रांतीचे आणि स्वाभिमानाचे बीज पेरले.

३५ पेक्षा अधिक कादंबऱ्या, हजारो ओव्या, लावणी आणि पोवाड्यांच्या माध्यमातून जनजागृती केली होती 

 त्यांनी लोककलेला समाजपरिवर्तनाचे हत्यार बनवले होते. 

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनलदास उपाध्यक्ष मनीषा कोळी वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम शहराध्यक्ष शिरीष जगदाळे जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले जिल्हा उपाध्यक्ष दिलीप निंबाळकर आदी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे





No comments:

Post a Comment