Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, August 13, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

दिव्यांग बांधवांच्या हृदयाला राखीचा स्नेहबंध – भोरमध्ये कुसुमवत्सल्य फाउंडेशनचा उपक्रम


भोर (प्रतिनिधी) :– प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याच्या स्नेहबंधनाने सजलेला रक्षाबंधन सोहळा भोरमध्ये विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला. कुसुमवत्सल्य फाउंडेशन ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने पंचायत समिती सभागृहात दिव्यांग बांधवांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात अंध, अपंग, मूकबधिर अशा विविध दिव्यांग बांधवांच्या हातावर राखी बांधण्यात आली, तसेच त्यांना फळाहार, गोडधोड आणि गिफ्ट्स देऊन आनंद साजरा करण्यात आला.





संस्थापक अध्यक्षा सौ. वैशाली पाटील यांनी कार्यक्रमादरम्यान दिव्यांग बांधवांशी स्नेहसंवाद साधत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले, “रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही, तर प्रेम, आधार आणि संरक्षणाचा जिव्हाळ्याचा धागा आहे. आज आपण हा धागा फक्त भावंडांपुरता न ठेवता समाजातील प्रत्येकासाठी जोडायला हवा.”


या कार्यक्रमाला भोर-वेल्हा-मुळशीचे माजी आमदार माननीय संग्रामदादा थोपटे, पंचायत समिती गटविकास अधिकारी किरणकुमार धनवडे, सहाय्यक गटविकास अधिकारी उदय जाधव, ज्येष्ठ पत्रकार व तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुरेश शेटे, रुग्ण कल्याण समिती सदस्य व दैनिक ‘सकाळ’चे पत्रकार विलास मतगुडे, शिव प्रहार संघटनेचे अध्यक्ष संतोष मोहिते, प्रहार संघटना अध्यक्ष बापू कुडले, उपाध्यक्ष महेंद्र सोनवणे,अनिल चव्हाण पीएसआय भोर पोलिस स्टेशन, महिला उपाध्यक्ष संगीता शिवतारे, संपर्क प्रमुख भानुदास दुधाने, सचिव शांताराम खाटपे, महिला संपर्क प्रमुख राणी ताई शिंदे, सदस्य वर्षाताई वल्लेवार, शंकर खोंडगे, अनिल दळवी, विद्या कोतवाल, मनीषा समर्थ, प्रो. अर्चना कल्याणी, मनीषा गिरमे, विजया घुले, सूर्यकांत घोणे, सतीश कालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कालेकर यांनी केले. त्यांनी आपल्या सुरेल आवाजात भावपूर्ण गाणी सादर करून सोहळ्याचे वातावरण अधिक रंगतदार बनवले. उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना प्रेम, आधार आणि सामाजिक सहभागाचा संदेश दिला.


कुसुमवत्सल्य फाउंडेशन ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिव्यांग बांधवांसोबत साजरा झालेला हा अनोखा स्नेहबंधाचा उत्सव त्यांच्या हृदयात कायमची गोड आठवण ठरला.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment