Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, August 10, 2025

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 सह्याद्री फाउंडेशनचा ‘एक राखी सैनिक बांधवांसाठी’ उपक्रमाला – मुस्ती, बोरामणी, कासेगाव पंचक्रोशीतील शाळांचा उत्स्फूर्त सहभाग


सोलापूर (प्रतिनिधी) ::- कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून सह्याद्री फाउंडेशनतर्फे राबविण्यात आलेल्या ‘एक राखी सैनिक बांधवांसाठी’ या उपक्रमाला बोरामणी भागातील विविध शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्या सीमेवरील सैनिकांना पाठवण्यात आल्या.


या उपक्रमात जिल्हा परिषद शाळा – बक्षीहिप्परग, दोड्डी, मुळेगाव तांडा, पिंजरवाडी, बोरामणी, वडजी, वडजी तांडा, कासेगाव, उळे, संगदरी, उळेवाडी, वरळेगाव, मुस्ती – तसेच शक्ती प्राथमिक आश्रम शाळा मुळेगाव तांडा, श्रीपातराव सोनटक्के हायस्कूल तांदुळवाडी, डी.एन. गायकवाड प्रशाला बक्षीहिप्परग, अनंतराव देवकते प्रशाला वडजी, बसवेश्वर हायस्कूल मुस्ती, शारदानिकेतन विद्यालय आणि स्प्रिंगफील्ड नॅशनल स्कूल, उळे या शाळेतील विद्यार्थिनींचा उल्लेखनीय सहभाग झाला.


सर्व संकलित राख्या १५ व्या बटालियन ‘द मराठा लाईट इन्फंट्री’ तुकडीस सुपूर्त केल्या. या सर्व राख्या १५ व्या बटालियन ‘द मराठा लाईट इन्फंट्री’ तुकडीमार्फत सीमेवर पोहोचवण्यात येणार आहेत. यावेळी कर्नल जितिन थॉमस, सुभेदार संभाजी मोरे, सुभेदार उत्तम पाटील, सुभेदार संतोष कोकरे, सुभेदार किशोर मापारे उपस्थित होते.

सह्याद्री फाउंडेशनतर्फे एपीआय उमेश रोकडे, सचिव प्रतिभा खंडागळे, प्रा. सविता नलावडे, मंजुश्री रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment