सारा न्यूज नेटवर्क -
अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने घेतली नागरिकांची काळजी.
ठाणे / दिवा (प्रतिनिधी) :- बुधवार दिनांक 20/08/2025
गेल्या तीन चार दिवसांपासून संपूर्ण राज्यात जोरदार 'अतिवृष्टी' होत आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरही अपवाद नाही.
ह्या अतिवृष्टीमुळे राज्या सहित दिव्यातीलही जगजिवन विस्कळीत झाले आहे.
अतिवृष्टीमुळे दिवा शहरातील नागरिकांच्या चाळींमध्ये नाल्या - गटारांचे पाणी घुसले आहे.तेथील नागरिकांना ह्या गटार,नाल्याच्या पाण्याचा खुपच त्रास होत आहे.तो त्रास नागरिकांना होऊ नये म्हणुन, शिवसेना दिवा शहर प्रमुख तथा ठाणे महानगर पालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत दशरथ मढवी यांनी आपले शिलेदार माजी नगर सेवक तसेच शिवसेना,दिवा उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गट प्रमुख, शिवदुत आणि महिला आघाडि यांना आदेश दिले आहेत की,दिव्यातील नागरीकांची काळजी घ्यावी.त्याच पाश्र्वभूमीवर *उमेश अशोक भगत*(शिवसेना,दिवा पूर्व विभाग प्रमुख) यांनी तातडिने श्री.बी.आर.नगर येथील 'सदगुरु चाळी पासुन ते सरस्वती बिल्डिंग' पर्यंत नाल्याची साफसफाई स्वतःउभे राहुन,ठाणे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करून घेतली.
त्यामुळे येथील नागरिकांच्या चाळीत घुसलेल्या पाण्याचा निचरा झाला व तेथील जवळ जवळ 2,000/- हजार असलेल्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.या प्रसंगी उमेश अशोक भगत यांचे सहकारी सूर्यकांत आत्माराम कदम (शिवसेना,दिवा पूर्व उपविभाग प्रमुख),अनिल मोरे (शाखाप्रमुख),नरेंद्र पाटील (उपशाखाप्रमुख),जेष्ठ शिवसैनिक कासार बाबा इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment