Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, August 9, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

संस्कारक्षम पिढी निर्मितीसाठी एक पाऊल पुढे..

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस आर पी कॅम्प सोलापूर 

 जवानांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न.. 


सोलापूर (प्रतिनिधी) :- एस आर पी एफ ग्रुप - 10 व चंदूकाका सराफ ज्वेलर्स,  सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने एस आर पी कॅम्प येथील  बहुउद्देशीय सभागृहामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  चंदूकाका सराफ ज्वेलर्स यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस आर पी कॅम्प ( गट शाळा ) येथील  विद्यार्थिनींनी गटातील जवानांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा केला.  विद्यार्थिनींच्या हातून राखी बांधून घेत असताना जवानांच्या डोळ्यात स्वतःच्या कुटुंबात बसून रक्षाबंधनाचा कार्यक्रम  करीत असल्याचा आनंद दिसत होता. सदैव लोकांच्या रक्षणार्थ स्वतःच्या घरातील  सणवार विसरून कामावर तत्पर असणाऱ्या जवानांना आज हा रक्षाबंधन आपल्या मुलीच्या  बहिणीच्या हातून राखी बांधून घेतल्यासारखा वाटला.  जवानांनी खेळाडूंना पायातील शूज घे, छान दप्तर घे, ड्रेस घे असे प्रेमाचे बोल बोलत त्यांच्या चिमुकल्या हातांवर   प्रत्येकाने  गोड गोड भेटवस्तू, रोख रकमा भेट दिल्या.. 





 संपूर्ण वातावरण कुटुंब वसल्ल्य प्रेमाने भरलेले होते. माननीय समादेशक डॉक्टर दिपाली काळे मॅडम 

 यांच्या मार्गदर्शनाखाली समादेशक सहाय्यक श्री जगळपुरे साहेब,पोलीस निरीक्षक तडवी साहेब,पोलीस उपनिरीक्षक व वेल्फेअर इन्चार्ज श्री साळुंखे साहेब यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली चंदूकाका सराफ ज्वेलर्स यांच्या विशेष सहयोगाने हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. 






 या वेळेला राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 च्या *एफ* कंपनी च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस आर पी कॅम्प सोलापूर शाळेस विशेष भेट  देण्यात आली. या कंपनीचे सर्व पोलीस अधिकारी अंमलदार व कर्मचारी यांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार.

 यावेळी गटशाळेचे मुख्याध्यापक श्री पुंडलिक कलखांबकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हा कौटुंबिक सोहळा साजरा केल्याबद्दल माननीय समादेशक, सहाय्यक समादेशक, व सर्व एस आर पी एफ च्या अधिकारी अंमलदार, कर्मचारी व चंदूकाका सराफ ज्वेलर्स यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. गट शाळा ही आपली शाळा असून याची गुणवत्ता उच्च दर्जाची ठेवण्याचा प्रयत्न शाळेकडून केला जाईल. खाजगी शाळांपेक्षा उत्कृष्ट शिक्षण शाळेमध्ये सुरू आहे. *सर्व गोष्टी एकदम होणार नाहीत परंतु एक दिवशी नक्की होतील* हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 



  समादेशक सहाय्यक श्री जगळपुरे  साहेब यांनी शाळेच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले. शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू. भौतिक सुविधांच्या बाबतीत ज्या अडचणी असतील त्या सोडवू. माननीय समादेशक मॅडम यांच्या शाळेविषयी असणाऱ्या संकल्पना खूप सकारात्मक आहेत त्यामुळे शाळेच्या विकासाला गटाचा खूप हातभार लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक श्री साळुंखे साहेब यांनी केले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment