सारा न्यूज नेटवर्क -
सोरेगाव येथील विकासकामांचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते भव्य शुभारंभ...!
सोलापूर(प्रतिनिधी) :- सोलापूर शहरातील प्रभाग क्र. २३ मधील सोरेगाव परिसरात पिण्याच्या पाईपलाइन कामाचे उद्घाटन मा.आमदार सुभाष बापू देशमुख साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटन झाल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधून परिसरातील नागरिकांना स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा मिळवून देण्यासाठी ही विकासकामे महत्वपूर्ण ठरतील,असा विश्वास व्यक्त केला.
या उद्घाटनप्रसंगी सरचिटणीस विशाल गायकवाड, मंडल अध्यक्ष महेश देवकर, महिला मंडळ अध्यक्षा नीलिमा शितोळे, सिद्धलिंग मसूती,भीमदे, संदीप कोळी, अमोल गायकवाड, श्रीनिवास बुरुडकर, मयूर घुगे, शितल गायकवाड, प्रवीण पवार, गोपाल पवार तसेच अनेक कार्यकर्ते व सोरेगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे




No comments:
Post a Comment