सारा न्यूज नेटवर्क -
बालसंगोपन योजनेच्या गुणवान विद्यार्थ्याचा पंढरपूर येथे सत्कार संपन्न..
पंढरपूर (प्रतिनिधी) :-भारतरत्न डॉ आंबेडकर सार्व वाचनालय तपकिर शेटफळ ता पंढरपूर संचालित महिला व बालविकास विभाग मान्यता पाप्त " क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन " योजनेच्या १०वी १२वी या बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्तापूर्ण यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याचा पंढरपूर येथील प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या सभागृहात मान्यवर पाहुण्यांचे शुभहस्ते ट्रॉफी मेडल देवून सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात आले . या कार्यकमास पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील जि.प माजी सदस्य तथा पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री तानाजी वाघमोडे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार चंद्रभागा सह.कारखान्याचे मा संचालक श्री सुधाकर कवडे पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( SP ) महिला अध्यक्षा सौ . राजश्री ताड ताई शेळके गावचे पालक प्रतिनिधी श्री संजय गाजरे सर हे उपस्थित होते.
या वेळी श्री तानाजी वाघमोडे व सुधाकर कवडे यांनी बालसंगोपन योजनेचे NGO चे प्रमुख श्री शत्रुघ्न कांबळे यांच्या मागील २५ / ३० वर्षाच्या समाजसेवेचा गौरवपूर्ण उल्लेख करून बालसंगोपन योजनेच्या पालकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वस्त केले. यावेळी राजेंद्र पाटील यांनीही आपले विचार मांडले. सौ.राजश्री ताड ताईंनी संस्थेच्या कामाचे भरभरून कौतुक केले व पंढरपूर तालुक्यातील योजनेच्या लाभार्थीची संख्या वाढवावी अशी मागणी केली.
संस्थेचे प्रमुख श्री शत्रुघ्न कांबळे सरांनी प्रास्ताविक भाषणामध्ये संस्थेकडील 200 लाभार्थ्यांचा आढावा घेवून २०० बालकापैकी १८८ पालकांना अनुदान आल्याचे सांगितले १२ लाभार्थ्यांना आधार सीडींग मॅपिंग अभावी अनुदान असल्याचे सांगून त्यांनी त्यांची बँकेशी संपर्क साधून सिडिंग करून घ्यावे २०० लाभार्थ्यां पैकी अनुदाना वाचून कोणीही वंचित राहणार नाही असे आश्ववस्त केले तसेच भविष्यात ४०० लाभार्थ्याचे उदिष्ट पूर्ण करू असे आश्वासन दिले.
यावेळी पालकांचाही सन्मान करण्यात आला शासनाच्या मानसेवेमध्ये अंगणवाडी सेविका पदावर निवड झालेल्या श्रीमती सोनाली घुले चिचुंबे श्रीमती शोभा मते अनवली तर श्रीमती रेश्मा शेख चळे स्त्री परिचारिका यांचा सन्मान करण्यात आला . पालकांच्या वतीने श्रीमती सोनाली घुले यांनी आपले विचार मांडून संस्थेच्या कामाचे व योजनेचे कौतुक करून समाधान व्यक्त केले . या वेळी २०० बालक व पालक उपस्थित होते . सूत्रसंचलन श्री अतुल सटाले सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री संजय गाजरे यांनी मानले .
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे






No comments:
Post a Comment