सारा न्यूज नेटवर्क -
सुयोग गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५’चा जल्लोषात शुभारंभ..!
सोलापूर (प्रतिनिधी) :- सीताराम साखर कारखान्याचे दूरदृष्टी असलेले कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांच्या प्रेरणेने साकारलेली जिल्हास्तरीय महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग ही केवळ एक स्पर्धा नसून साखर उद्योगातील बांधिलकी, मैत्री आणि सामंजस्याचा एक अद्वितीय पूल आहे. ही स्पर्धा साखर क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून एक नवीन बंध निर्माण करणारी ठरेल. त्यामुळे यापुढील काळात ही स्पर्धा राज्यस्तरावर आयोजित करण्यात यावी, अशी अपेक्षा आमदार समाधान अवताडे यांनी व्यक्त केली.
3 ते 10 ऑगस्ट दरम्यान दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर खेळल्या जाणार्या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग 2025 या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पूजनाने उत्साहात करण्यात आले. त्यावेळी आमदार अवताडे बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीप माने हे होते. यावेळी धनश्री, सीताराम व आष्टी परिवाराचे मार्गदर्शक प्रा.शिवाजीराव काळुंगे, सीताराम महाराज साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड, श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज तथा अण्णाराज काडादी, उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, भैरवनाथ शुगरचे प्रा.शिवाजी सावंत, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, सहकारमहर्षी साखर कारखान्याचे सयाजीराजे मोहिते-पाटील, श्री संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, संचालक औदुंबर वाडदेकर, बसवराज पाटील, राजेंद्र पाटील, दयानंद सोनगे, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्याचे प्रणव परिचारक, जकरायाचे राहुल जाधव, वेदांत साठे, प्रादेशिक उपसंचालक पांडुरंग साठे, एस.एन. चिवटे, पृथ्वीराज माने आदी उपस्थित होते. प्रारंभी सीताराम व आष्टी शुगर परिवाराचे कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विजेत्यांना देण्यात येणार्या ट्रॉफीचेही अनावरण करण्यात आले.
यावेळी प्रा.शिवाजी सावंत, प्रणव परिचारक, समाधान काळे, पृथ्वीराज माने, अप्पासाहेब खुळे यांनी मनोगत व्यक्त केले.
सोलापुरात सुयोग गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारली साखर उद्योगाची ऐक्यदर्शक लीग !
सुयोग गायकवाड यांचा दूरदृष्टीपूर्ण उपक्रम – ‘MSCL 2025’ने घेतली एकतेची झेप !
‘महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग’ – सुयोग गायकवाड यांच्या प्रेरणेतून साखर उद्योगात नवचैतन्य !
सुयोग गायकवाड यांच्या नेतृत्वात साखर उद्योगात मैत्रीचा नवा अध्याय – MSCL 2025 !
सोलापुरात MSCL 2025 ची धडाकेबाज सुरुवात, सुयोग गायकवाड यांचा अभिनव प्रयोग !
सुयोग गायकवाड यांनी घडवली महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग – एकतेचे, उत्साहाचे प्रतीक !
‘खेळातून एकतेकडे’ – सुयोग गायकवाड यांचे MSCL 2025 हे साखर उद्योगासाठी ऐतिहासिक पाऊल !
MSCL 2025: सुयोग गायकवाड यांच्या पुढाकाराने साकारली औद्योगिक ऐक्याची नवी ओळख !





No comments:
Post a Comment