Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, October 14, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



 डॉ .संदीप आडके यांना वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय समाजकार्याबद्दल डॉ. द्वारकानाथ कोटणीस पुरस्कार.


सोलापूर :- सोलापुरातील प्रसिद्ध अस्थिरोग व रशियन इलिझारोव्ह तज्ञ डॉ. संदीप आडके यांना त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध समाजकार्य केल्याबद्दल आय एम ए सोलापूर यांच्यातर्फे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या ११६ व्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. कोटणीस की यादे हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कर्नल प्रकाश महानवर यांच्या हस्ते दि. १३.१०.२०२६ रोजी आय एम ए हॉल येथे देण्यात आला. त्याप्रसंगी डॉ.कोटणीस फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मोकाशी व सोलापुरातील अनेक मान्यवर डॉक्टर उपस्थित होते. 



डॉ.संदीप आडके यांनी पाकिस्तान , नेपाळ व भारतात अनेक ठिकाणी मोफत अस्थिरोग व रशियन इलिझारोव्ह पद्धतीने अनेक गरजू व गरीब रुग्णांवर शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. सुदान येथे गृहयुद्ध चालू असताना सुद्धा तेथे जाऊन युद्धातील अस्थि रुग्णांवर उपचार करण्याबाबतचे प्रशिक्षण जानेवारी महिन्यात त्यांनी सुदान मध्ये जाऊन दिलेले आहे. १९९३ सालच्या लातूरच्या भूकंपामध्ये त्यांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयांमध्ये भूकंपातील सर्व रुग्णांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपचार व दोन आठवड्यामध्ये ७५० अस्थिरोग शस्त्रक्रियामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. गेले अनेक वर्ष ते आडके हॉस्पिटल या ठिकाणी दर बुधवारी शिबिराच्या स्वरूपात गरीब व गरजू रुग्णांसाठी अत्यंत कमी दरात उच्च प्रतीची वैद्यकीय सेवा देत आहेत. अनेक प्राण्यांच्या फ्रॅक्चरर्स वर त्यांनी मोफत रशियन पद्धतीने उपचार केलेले आहेत. 


No comments:

Post a Comment