सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर ब्रेकिंग : विजापूर नाका पोलिसांचा रात्री सर्जिकल स्ट्राईक;
चायनीज गाड्या आणि टपऱ्यांवर हुल्लडबाजी करणाऱ्या 11 जणांवर कारवाई..
सोलापूर - विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड, औद्योगिक चौकीचे अंमलदार आणि डी.बी. पथकाच्या अंमलदारांनी संयुक्तपणे गस्त घातली.
किल्लेदार मंगल कार्यालय परिसर, आसरा चौक मैदान, आयकर भवनच्या शेजारील परिसर आणि गायकवाड कॅन्टीन या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत थांबून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना हुसकावून लावण्यात आले.
या कारवाईत म.पो.का.क. 110/117 अन्वये एकूण 11 कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच परिसरातील चायनीज गाड्या, टपरीवाले आणि चकना विक्रेत्यांना रात्री उशिरापर्यंत व्यवसाय बंद करण्याबत आणि गर्दी जमवू न देण्याबाबत कडक समज देण्यात आली आहे.
रात्रीच्या वेळी नागरिकांना त्रास होऊ नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ही गस्त आणि कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


No comments:
Post a Comment