सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) :- मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य पुरस्कृत "सर्वोत्कृष्ट अपराधसिध्दी" पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील पुणे सीआयडी आँफिस पाषाण चव्हाण नगर सी पी आर येथे झाला. यावेळी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे यांस "सर्वोत्कृष्ट अपराधसिध्दी" पुरस्काराने गौरविण्यात आले.
सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे गु. नोंद क्र. 01/2022, भा. द. वि . क . 302, 201, 376, 376(a)(b), 511, 34 पोस्को ॲक्ट क. 6, 21, भा. रेल अँक्ट 147, 165 अन्वये दाखल गुन्ह्याचा तपासास सोलापूर पोलीस ठाण्यातील पथकास" "सर्वोत्कृष्ट अपराधसिध्दी" साठीचे बक्षीस मिळाले आहे.
नमूद गुन्ह्याचे तपास पथकामध्ये माननीय पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय वाघमारे सहाय्यक पोलीस फौजदार संजय जाधव पोलीस हवालदार प्रमोद सुरवसे मोलाची कामगिरी बजावलेली आहे. सदर पुरस्कार दिली भुजबळ विशेष पोलीस महानिरीक्षक,राज्य गुन्हे अन्वेषण अभिलेख, महाराष्ट्र राज्यसंजय येनपुरे, विशेष पोलीस महानिरीक्षक,गुन्हे, पश्चिम, CID पुणे यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment