Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, November 8, 2023

महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने महाराष्ट्रातील स्थानिक संस्था समन्वयक साधण्यासाठी जिल्हा समन्वयकांची नियुक्ती..

 सारा न्यूज नेटवर्क - 



पुणे(प्रतिनिधी) : - महा एनजीओ फेडरेशन जिल्हा समन्वयक नियुक्ती प्रदान व स्नेहमिलन समारंभाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व जिल्हा समन्वयकांना त्यांच्या जबाबदारीसाठी नियुक्ती पत्र देण्यात आले. फेडरेशनच्या माध्यमातून तळागाळातील संस्थापर्यंत पोहोचून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे.


थ्री डी डेस्टिनेशन हॉल मुकुंद नगर पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी  महा एनजीओ फेडरेशन संस्थापक तथा महाराष्ट्र शासन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष व राज्यमंत्री शेखर मुंदडा, वरीष्ठ संचालक मुकुंद शिंदे, संचालक अमोल उंबरजे, योगेश बजाज, अक्षय महाराज भोसले, गणेश बाकले उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील जिल्हा समन्वयक उपस्थित होते.


संस्थापक शेखर मुंदडा यांनी सर्व समन्वयकांना महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने जिल्हा समन्वयकाचे ध्येय व उद्दिष्ट्ये त्याचबरोबर समाजात कोणत्या पद्धतीने महा एनजीओ फेडरेशनची वाटचाल असली पाहिजे, यावर मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र गोसेवा आयोग ७ जी म्हणजे गो संगोपन,गोसंरक्षण, गो संवर्धन, गोशाळा,गोरक्षक, गो मूल्यवर्धन व गो आधारित शेती बाबत माहिती दिली.

अक्षय महाराज भोसले यांनी शासकीय योजना तळागाळा तील लोकांपर्यंत कसे पोहचवता येतील यावर मार्गदर्शन केले. योगेश बजाज यांनी समन्वय साधला व वरिष्ठ संचालक मुकुंद शिंदे यांनी सर्वांचे अभिनंदन केले व आभार मानले. कार्यक्रमा साठी राहुल जगताप, अपूर्वा करवा, स्वप्निल पोफळे व विठ्ठल काळे यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील समन्वयक निवड करण्यात आली सोलापूर मध्ये डॉ.मनोज देवकर सोलापूर यांची जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे.

डॉ. मनोज देवकर यांची सर्व संस्थांची शिखर संस्था महा एनजीओ फेडरेशन  जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली यांची निवड महाराष्ट्र शासन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष व राज्यमंत्री श्री शेखर मुंदडा यांनी नियुक्तीपत्र देऊन केली. 


डॉ मनोज देवकर यांनी गेली 15  वर्ष पर्यावरण व सामाजिक कार्यामध्ये त्यांचे योगदान पाहून शासनाने यापूर्वी डॉक्टरेट पदवीही बहाल केली आहे त्यानंतर शासन स्तरावर वेगवेगळ्या जबाबदारी पार पडली आहे त्यांचा कार्याचा आढावा घेत त्यांची ही समन्वयकाची निवड करण्यात आली.


 सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment