सारा न्यूज नेटवर्क -
कल्याण (प्रतिनिधी) :- दिपावलीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ११ नोव्हेंबरला संत रोहिदास विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा मा.सौं सुरेखाताई निवृत्ती दिघे त्यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे खजिनदार मा.श्री निवृत्ती दिघे साहेब. कोकण विभाग युवक अध्यक्ष.मा.कु विजय भाऊ चांदोरकर. रायगड जिल्हा युवक अध्यक्ष मा.कु रोहित भाऊ पहेलकर या सर्वांच्या उपस्थितीत दिपावली एक हात मदतीचा निमित्त "आय आर ए ब्लेसिंग ट्रस्ट" अनाथ मुलांना फराळ वाटप करण्यात आला.
यावेळी संत रोहिदास विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ सुरेखाताई दिघे म्हणाल्या कि या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप समाधान वाटल आणि त्यांच्यासोबत थोडा वेळ गप्पा मारून त्यांचे मनोगत ऐकून घेतले, एका दिवसाचा,एका तासाचा किंव्हा एका क्षणाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहून खूप समाधान वाटले संत रोहिदास विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने राबवण्यात आला याचा आम्हाला आनंद आहे. आणि आपल्यांना सुद्धा आनंद वाटेल असं हे कार्य फाउंडेशनच्या माध्यमातून झालेला आहे.आम्ही सर्वांचे ऋणी आहोत धन्यवाद. असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संस्थेचे सभासद व इतर सदस्य उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment