Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, November 10, 2023

खुषखबर! सोलापूर महापालिकेची भरतीची जाहिरात निघाली...

 सारा न्यूज नेटवर्क - 


खुशखबर..! सोलापूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्ण संधी

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त असणारी 226 पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून जाहिरात अलीकडे प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऐन दिवाळीच्या निमित्त महापालिका प्रशासनाकडून या मेगा भरतीचा धमाका उडविण्यात आला आहे. 



सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट "अ " (अराजपत्रित) ते गट " ड " मधील विविध २६ संवर्गाकरिता जागा भरण्यात येत आहेत. प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहीरात देण्यात आली आहे. विविध पदांसाठी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत. www.solapurcorporation.gov.in या संकेत स्थळावर सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. विविध पदांची माहिती तसेच त्यांची वेतनश्रेणी आदींची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून बिंदू नामावली मंजुरीसह या रिक्त पद भरती संदर्भात आवश्यक ती तयारी महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही भरती प्रक्रिया शासन आदेशानुसार टीसीएस या कंपनीच्या मार्फत राबविण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली - उगले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment