सारा न्यूज नेटवर्क -
सौ. लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी गुरववाडी ता.अक्कलकोट जि. सोलापुर
एकुण ६५ लाख रुपये निधि गाव विकास कामाचा लेखाजोखा ....
अक्कलकोट (प्रतिनिधी) :- खेड्याचा देश म्हणून ओळखल्या जाणार्या भारत देशाची एकुण ६४९४८१ खेडे आहेत आणि त्यातुनच महाराष्ट्रातील गावांची संख्या ६३७३३ एवढी आहे देशात एकुण लोकसंख्याच्या ६५.५३५ लोक खेड्यागावात राहतात .त्यामुळे आजही बहुसंख्य नागरिक खेड्यातच राहतात म्हणजे भारत खेड्याचा देश होता आणि आज ही आहे . अक्कलकोट तालुक्यातील साधारण १३०० ते १५०० लोकसंख्या असलेले गुरववाडी हे छोटेसे गाव गावाचे माझी सरपंच व विध्यमान ग्रापंचायत सदस्य श्री म्हाळप्पा चिनप्पा पुजारी यांना सबंध अक्कलकोट तालुक्यातील नागरिक गुरववाडी गावाचे विकासरत्न म्हणून ओळखतात स्वतच्या गावासाठी काहीतरी वेगळे करून दाखविण्याचे जिद्द असलेले सरळ आणि साध्या स्वभावाचे व्यक्तिमहत्व म्हणून म्हाळप्पा पुजारी यांची ख्याती आहे.
गावात वीज पाणी ,पिण्यायोग्य पाणी , चांगले सिमेंट रोड , बसण्यासाठी बाकडे ,शिक्षण व आरोग्य या गोष्टीवर त्यांनी भर दिला आहे ... गावातील लोकांसाठी त्यांनी लोकांच्या हितासाठी आनेक उपक्रम राबिवले आहे . गावाच्या हितासाठी व गाव विकासाठी त्याची इच्छाशक्ती प्रचंड आहे . सर्व अडचनिवर मात करत एक आदर्श गाव कसे निर्माण करता येईल याकडे त्यांचे वाटचाल चालू आहे. गुरववाडी गावात राबवलेल्या उपक्रमबद्दल तसेच गाव विकास कामाबद्दल थोडक्यात माहिती पाहुयात
आज तागायत ५ वर्ष सरपंच,२० वर्ष ग्रामपंचायत सदस्य, ५ वर्ष तालुका युवक कॉग्रेस उपाध्यक्ष, ५ वर्ष दुधनी मार्केट कमिटी संचालक , ५ वर्ष भटक्या विमुक्त जाती व जमाती उपाध्यक्ष , कॉग्रेस कमिटी सोलापुर असे विविध पदे म्हाळप्पा चिनप्पा पुजारी यांनी भूषवलेले आहेत . त्याचे वडील कै चिनप्पा पुजारी यांना सन १९७७ मध्ये गुरववाडी गावचा प्रथम सरपंच होण्याचा मान प्राप्त झाला आहे व सध्या सन २०२१ ते आजतागायत २०२३ कै चिनप्पा पुजारी यांची सुन व म्हाळप्पा चिनप्पा पुजारी यांची धर्म पत्नी सौ लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी या गुरववाडी गावाच्या विध्यमान महिला सरपंच म्हणुन कार्यरत आहेत .
सौ लक्ष्मी पुजारी या पहिले ५ वर्ष गुरववाडी गावाच्या ग्रामपंचायत सदस्य होत्या तसेच अक्कलकोट तालुका कॉग्रेस कमिटीच्या महिला कॉग्रेस उपअध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहीले आहे . आजतागायत पुजारी घराण्यातील तब्बल तीन पिढ्यांनी सरपंच म्हणुन काम पाहीले आहे कै .श्री चिनप्पा पुजारी ,श्री म्हाळप्पा पुजारी व सौ लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी.
विध्यमान महिला सरपंच सौ लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांचे सरपंच पदाचे ३ वर्ष यशस्वी वाटचाल पूर्ण होत आहे . त्याच्या यशस्वी कारकीर्द गाव विकास कामाचा लेखाजोखा खालीलप्रमाणे.....
सन २०२०-२०२१ मधील कामाचा तपशील ........
> १५ वित्त आयोग ग्रामपंचायत निधीतून १० लाख रुपये ....
> रोजगार हमी योजने अंतर्गत जि प शाळा मैदान मुरमीकरण करणे ४ लाख रुपये ..
> समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापुर दलित वस्ती सीमेंट रोड करणे ३ लाख रुपये ....
> समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापुर अक्कलकोट रोड दलित वस्ती लगत मराठवाडी जाणारे जोड रस्ता सीमेंट रोड करणे ३ लाख रुपये .....
> समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापुर मधून दलित वस्ती मध्ये बंदिस्त गटार करणे ३ लाख रुपये ...
> जि प शेष फंडातून गटार काम सिधारूढ मठ ते बसवेश्वर मंदिर परिसर व नागणसुर रोड पर्यन्त गटार करणे २ लाख रुपये .....
> सौ लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांनी सरपंच मानधनातून ग्रामस्थांना बसण्यासाठी सिमेंट बाकडे उपलब्ध करून दिले ५० हजार रुपये ...
सन २०२०-२०२१ मध्ये ग्रामपंचायत गुरववाडी मध्ये गाव विकास कामासाठी २५ लाख ५० हजार रुपयाचे काम पूर्ण झाले आहे ...
सन २०२१-२०२२ मधील कामाचा तपशील ........
> १५ वित्त आयोग ग्रामपंचायत निधी मधून आयोग मधुन वार्ड क्रमांक ०१ मध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता ३ लाख रुपये ......
> सार्वजनिक पाणीपुरवठा टाकी व संरक्षण भिंत बांधकाम करणे खर्च २ लाख रुपये......
> समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापुर मधुन दलित वस्ती सुधारणा अंतर्गत मातंग समाज वस्तीमध्ये नालाबंदिस्त गटार ३ लाख ५० हजार रुपये ....
> रोजगार हमी योजनेअंतर्गत गावामध्ये मुरमीकरण रस्ता करणे ५ लाख रुपये.....
> ग्रामपंचायत निधीतून श्री सिद्धप्पा सावळी यांच्या घरासमोरील गटार मध्ये पाईप टाकून रस्ता करणे खर्च ५० हजार रुपये....
> गुरुवाडीचे ग्रामदैवत श्री शीलवंतिदेवी गावातील देवस्थान करिता वरंडा बांधकाम व लोखंडी जाळी व गेट बसवणे १ लाख ५० हजार रुपये.......
सन २०२१-२०२२ मध्ये ग्रामपंचायत गुरववाडी मध्ये गाव विकास कामासाठी १५ लाख ५० हजार रुपयाचे काम पूर्ण झाले आहे ...
सन २०२२-२०२३ मधील कामाचा तपशील ........
> गुरव समाज स्मशानभूमी वॉल कंपाऊंड बांधकाम करणे खर्च ५ लाख रुपये……
> १५ वित्त आयोग अंतर्गत लक्ष्मी देवी परिसर ते हनुमान मंदिरापर्यंत बंदिस्त गटार करणे २ लाख रुपये....
> १५ वित्त आयोग मधुन जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड व मराठी शाळेतील मुलांना पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईपलाईन करणे १ लाख ५० हजार रुपये.....
> १५ वित्त आयोग मधुन धनगर समाज मंदिर दुरुस्ती व रंग-रांगोटी करणे खर्च ५० हजार रुपये ......
> महिला बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापुर कडून मिनी अंगणवाडी शाळा बांधकाम करणे खर्च ८ लाख रुपये ...
> १५ वित्त आयोग मधुन जिल्हा परिषद प्राथमिक मुख्य महाद्वार अर्थात मेन रोड लगत असलेले प्रवेशद्वार व काँक्रीट गेट शाळेसमोरील सिमेंट काँक्रीट रस्ता करणे १ लाख ५० हजार रुपये ......
> स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे खर्च ३ लाख रुपये.
> ग्रामपंचायत स्वनिधीतून शहीद जवान स्मरण कोनशीला बसविणे व वृक्षारोपण करणे व इतर खर्च ५० हजार रुपये .....
सन २०२३-२०२४ मध्ये ग्रामपंचायत गुरववाडी मध्ये गाव विकास कामासाठी २२ लाख रुपयाचे काम पूर्ण झाले आहे ...
सौ लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे सन २०२० ते २०२३ या तीन वर्षाच्या कालावधीत एकुण ६५ लाख रुपये निधि गाव विकास कामासाठी खर्च करण्यात आला आहे.
सन २०२३-२०२४ व २०२४-२०२५या वर्षामध्ये प्रशासकीय स्तरावर ग्रामपंचायत ठरावाद्वारे सूचित केलेले प्रलंबित कामे पुढीलप्रमाणे .......
> जन सुविधा योजनेअंतर्गत गावात सिमेंट काँक्रेट रस्ता करणे.. ५ लाख रुपये
> जन सुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी धनशेड बांधकाम करणे ५ लाख रुपये
> जन सुविधा योजनेअंतर्गत गावांतर्गत फेवर ब्लॉक बसवणे ५ लाख रुपये
> सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत वार्ड क्रमांक १ मध्ये नालाबंदिस्त गटार करणे १५ लाख रुपये ....
> जलजीवन मिशन योजना अंतर्गत विहीर खोलीकरण करणे २ कि.मी.पाईपलाईन करणे तसेच उंच टाकी बांधणे एकूण खर्च ६५ लाख रुपये
सन२०२३-२०२४व२०२४-२०२५या वर्षामध्ये प्रशासकीय स्तरावर एकुण ८५ लाख रुपये कामाचे ठराव करून प्रशासकीय स्तरावर पाठविण्यात आले आहे.वरील पैकी काही कामांना प्रशाकीय स्तरावर मंजुरीसाठी तालुका लोक प्रतिंनिधी व प्रशाकीय यांच्याकडून प्रयत्न चालू आहे. सदर कामांना लवकरच मंजुरी मिळेल अशी आशा आहे ..
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment