सारा न्यूज नेटवर्क -
अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त वंचित पिढीत घटकाला न्याय मिळवून देणारी महिला म्हणून आगळी वेगळी ओळख.
सोलापूर (प्रतिनिधी) :- भीम आर्मी सामाजिक संघटनेच्या नूतन सोलापूर शहर अध्यक्ष म्हणून विशाखा उबाळे यांची नुकतीच लॉटरी लागली असून महाराष्ट्र अध्यक्ष सीताराम गंगावणे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे विशाखा यांना आता भीम आर्मी सोलापूर शहर पदाची जबाबदारी पार पाडायची आहे .त्यांनी भीम आर्मी या संघटनेमध्ये २०१९ मध्ये प्रवेश केला असून आजतागायत अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग दाखवले आहे विशाखा यांची कर्यशैली आगळीवेगळी असून त्यांनी आज पर्यंत अनेक प्रश्नांवर विविध अन्यायग्रस्त वंचित पीडित घटकांसाठी प्रशासन दरबारात नेहमीच आवाज उठवून न्याय मिळवून देण्याची भूमिका पार पाडली आहे याच कार्याची दखल वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेत त्यांना आता शहर अध्यक्ष पदाची धुरा सोपविली आहे.
विशाखा यांच्याकडे यापूर्वी शहर सचिव हे पद होते त्या पदाला इतंभुत न्याय देण्याचे काम त्यांनी आजवर केले सोलापुरात ठिकठिकाणी आंदोलने झाली त्यात पूर्णपणे झोकून देऊन त्यांनी काम केले आहे सोलापुरातील भीम आर्मी मधील संघटना वाढीसाठी संघटनेतील नेहमीच एक अग्रेसर चेहरा म्हणून ओळखला गेला आहे.
*महिला सक्षमीकरणासाठी काम* -
भीम आर्मी संघटनेच्या माध्यमातून विशाखा उबाळे यांनी नेहमीच सामाजिक प्रश्नांसह महिला सक्षमीकरणासाठी काम करत आल्या आहेत संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आजवर महिलांना लघु उद्योग बचतगट असो अथवा महिलांसाठी असलेल्या सर्व शासकीय योजनांची माहिती करून देणे व त्यांचा लाभ मिळवून देणे अश्या विविध प्रकरच्या कामातून व महिला कशे स्वावलंबी होतील सक्षमीकरण होतील याकडे नेहमीच विशाखा यांचा कल राहिलेला आहे
*शहरअध्यक्ष पदाची धुरा इमाने इतबारे पार पाडेन* -
सोलापुरात सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक प्रश्नांवर भीम आर्मी संघटनेच्या माध्यमातून अन्यायग्रस्त वंचित पीडित घटकांसाठी काम करण्याची संधी मला आजपर्यंत मिळाली २०१९ पासून मी या संघटनेत काम करत असून अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून संघटनेचा एक परिपूर्ण सदस्य बनण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे माझ्या कामाची दखल घेत संघटनेतला सक्रिय सहभाग पाहता मला सोलापूर शहर सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली होती त्याच्या माध्यमातून शहरात समाजात असणाऱ्या विविध प्रश्नांवर मुद्द्यांवर आम्ही संघटनेच्या वतीने कार्यक्रम आंदोलन करत चळवळ कायम ठेवण्याचे काम केले असून आज देखील माझ्या कामाची दखल वरिष्ठांनी घेऊन मला सोलापूर शहर अध्यक्ष पदाची धुरा सोपवली असून यापुढे देखील संघटनेचे काम इमाने इतबारे करत राहीन अशी भावना दैनिक लोकशाही मतदार शी बोलताना विशाखा यांनी व्यक्त केल्या आहे.
तर विशाखा यांना भीम आर्मीच्या सोलापूर शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली असल्याचे सर्वांना समजताच त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment