Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, November 25, 2023

ब्रेकींग:-१२ तासाच्या आत चोरट्याच्या मुसक्या आवळून चोरीस नेलेली एर्टिगा चारचाकी वाहन हस्तगत...

 

सारा न्यूज नेटवर्क - 

विजापूर नाका गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी...

सोलापूर (प्रतिनिधी) :- दि. २१/१/२०२३ रोजी १२.३० वा. ते दि. २२/११/२०२३ रोजीचे सकाळी ०९.०० वा.च्या दरम्यान सैफन नदाफ यांचे गॅरेज ए. जी. पाटील कॉलेज, विजापूर रोड, सोलापूर येथुन फिर्यादीनी पार्क केलेली फिर्यादीची KA-26-N- 2487 ही एर्टिगा चारचाकी गाडी कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचुन मुददाम लबाडीने चोरून नेला आहे. म्हणून वगैरे मजकुराची फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजापूर : भा. दं.वि. कलम ३७९ अन्वये नुसार गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याच्या अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजकुमार वाघचवरे व पोलीस निरिक्षक उमकांत शिंदे यांनी घटनास्थळ भेट देवुन पोसई मुकेश गायकवाड व गुन्हे प्रकटीकरण पथकाला चोरीस गेलेली मारूती सुझुकी कंपनीची एटिंगा शोधण्याकामी सुचना दिल्या होत्या त्या गुन्हेप्रकटीकरण पथकातील अंमलदार सी.सी.टि.व्ही. फुटेज व बातमीदारा मार्फतीने शोध चालु होता. त्या दरम्यान अनुशंगाने पोउपनि / मुकेश गायकवाड व गुन्हे प्रकटीकरण पथकास गुप्तबातमीदार द्वारे माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील चोरीस गेलेली मारूती सुझुकी कंपनीची एर्टिगा ही गाड़ी एक इसम पुणे नॅशनल हायवे, सोलापूर येथे येणार असल्याची बातमी मिळाल्याने त्यावरून पोउपनि/मुकेश गायकवाड व पथक रवाना झाले आणि मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन सदर गुन्ह्यातील चोरीस मारूती सुझुकी कंपनीची एटिंगा ताब्यात घेऊन जप्त केला आहे. सदरची चारचाकी गाडी चोरी करणारा गुन्हेगार नाव फैजान इख्तियार डोणगांवकर वय १९ वर्षे, रा. घर नं. ६३ केशव नगर, झोपडपट्टी, मौलाली चौक, सोलापूर यास सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे. आरोपीस अटक करून त्यांच्याकडुन विजापुर नाका पोलीस स्टेशन मध्ये भा.दं.वि. संहीता कलम ३७९ मधील चोरीस गेलेला मारूती सुझुकी कंपनीची एर्टिगा KA-26-N-2487 एकुण किंमत १०,००,०००/- रूपये, अक्षरी दहा लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून १२ तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र माने सौ, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे सौ. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सो वि-२ राजु मोरे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजकुमार वाघचवरे सो पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उमाकांत शिंदे सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि / मुकेश गायकवाड, पोना / हुसेन शेख, पोशि/संतोष माने, अमृत सुरवसे, श्रीनिवास बोल्ली, राहुल विटकर, रमेश कोर्सेगाव, समाधान मारकड, राहुल सुरवसे यांनी पार पडली.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment