Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, November 29, 2023

रात्रीच्या पावसामुळे नाल्यात वाहून गेल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू..

 सारा न्यूज नेटवर्क - 


सोलापूरात नाल्यात वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू   मुसळधार अवकाळी पावसाने घेतला बळी. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूरात नाल्यात वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू ; मुसळधार अवकाळी पावसाने घेतला बळी

 सोलापूरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यात वाहून गेल्याने एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. सोलापुरातल्या जोडभावी पेठ परिसरातील धक्कादायक घटना घडली. सलाम दलाल असे 35 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मुसळधार पावसात घरी परत येत असताना कुंभार वेस परिसरातील नाल्याजवळ गाडी घसरल्याने मृत तरुण कोसळला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने प्रवाहासोबत तो वाहून गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झालंय. मृत सलाम दलाल याला एकूण 3 मुलं असून अवघ्या 3 महिन्याचा बाळ आहे तर 5 आणि 3 वर्षाचे दोन मुलं ही अनाथ झाली आहेत. मुंबईत झालेल्या 26/11 च्या वेळेस वडील साबीर दलाल यांना गोळी लागल्याने जखमी झाले होते, काही महिन्यापूर्वी त्यांचा ही मृत्यू झाला होता. आता कुटुंबातील कर्ता असलेल्या सलाम याचा ही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातं आहे. सलाम दलाल हा माझा नातेवाईक होता. 26 11 च्या हल्ल्यात त्याचे वडील साबीर दलाल यांना गोळी लागल्याने ते जखमी झाले होते. या घटनेला दोनच दिवसांपूर्वी 14 वर्षे पूर्ण झाले. त्यानंतर आता ही अशी दुर्दैवी घटना घडली आहे. सलाम यांना तीन लहान चिमुकले मुलं आहेत. या सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासनाने या कुटुंबाला योग्य तो न्याय द्यावा, अशी प्रतिक्रिया हाजी इम्तियाज दलाल यांनी दिली. ते मृत सलाम यांचे नातेवाईक आहेत.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment