सारा न्यूज नेटवर्क -
15 नोव्हेंबर 2023,
सोलापूर (प्रतिनिधी) :-सोलापूर शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. राहुल शिरसाट नेमणूक पोलीस मुख्यालय असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. अज्ञात कारणावरून स्वतःवरच गोळी झाडून पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह शविच्छेदनासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आत्महत्याचे कारण अद्याप समजले नसून या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment