Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, November 7, 2023

सोलापूर महापालिकेच्या NHM व क्षयरोग कंत्राटी कर्मचारी वतीने शासकीय सेवेत कायम रुजू करुन घेण्यासाठी आंदोलन...



सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्हा परिषद येथील पूनम गेट येथे 2 नोव्हेंबर पासून सोलापूर महापालिकेच्या NHM व क्षयरोग कंत्राटी कर्मचारीच्या वतीने सर्व कर्मचारी संपावर बसले आहेत.

* त्या सोबत दि. ०२/११/२०२३ पासून पूर्ण राज्यभर महाराष्ट्र आरोग्य अभियान (NHM) व क्षयरोग विभाग (TB) सर्व कर्मचारी संपावर आहेत. 


त्यांच्या मागण्या महत्त्वाचे मुद्दे  खालील प्रमाणे आहेत


१) महानगरपालिकेच्या कायम, रिक्त पदांवर NHM व क्षयरोग विभागाकडील कर्मचाऱ्यांचे विनाशर्त वयाची अट शिथील करून कायम पदावर समायोजन करण्यात यावे.


२) कायम होईपर्यंत समान काम समान वेतन करण्यात यावे.

 ३) विमा व मेडीकल कॅशलेस ५ लाखापर्यंत मिळावे.

(४) आजारी असल्यास पगारी वैद्यकीय रजा मिळावे.

५) सध्या दिवाळी सणासाठी महानगरपालिकेकडून सर्व NHM व क्षयरोग विभाग (TB) कडील कर्मचाऱ्यांन दिवाळी बोनस देण्यात यावा.

(६) आरोग्य सेविकेवर असणारा अतिरिक्त कामाचा भार (ऑनलाईन कामाचा भार) कमी करणे.

(७) कार्यरत कर्मचाऱ्यांच्या घरातील व्यक्ती आजारी असल्यास त्यांची सेवा करण्यासाठी ३ महिने विशेष पगारी रजा मिळावी.

ईत्यादी मागणी साठी कंत्राटी कर्मचारी संपावर बसले आहेत.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment