सारा न्यूज नेटवर्क -
संविधान दिना निमित्त क्रांतीसुर्य प्रतिष्ठान च्या वतीने मोफत वह्या वाटप
26 नोव्हेंबर 2023
सोलापूर(प्रतिनिधी) :- क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने संविधान दिना निमित्त विद्यार्थाना मोफत वहया वाटप शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर मध्य विधानसभा समन्वयक मा. निरंजन बोध्दूल यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमूख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक बाबू जमादार, शशीकांत उकरंडे, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श धडे होते. प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच संविधान वाचन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment