सारा न्यूज नेटवर्क -
शिवाजी पार्क मधील मंडप डेकोरेटर कडून होत असलेल्या मनमानीला आळा घालावा.
मबई (प्रतिनिधी) :- दरवर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क व चैत्यभूमी परिसरात राज्यातील विविध सस्था संघटना युनियन तसेच राजकीय सामाजिक संघटनांकडून आंबेडकरी अनुयायां साठी विविध उपक्रम राबविले जातात, जाहीर अभिवादन, सभा, भोजन दान, चहा, नाश्ता पाणी, आदी सोयी पुरविल्या जातात. यासह बुक स्टॉल विविध कार्यक्रमांचे स्टाल लावले जातात . याकामी मंडप, साऊंड सिस्टीम आदींसाठी मनपा ने चार ते पाच खाजगी डेकोरेटर्स यांची नियुक्ती केली आहे असे कळते. मात्र हे डेकोरेटर्स मंडप डे कोरेशन व साऊडं सिस्टीमच्या पोटी अव्वाच्या सव्वा रक्कम करून आयोजकांची अक्षरशः पिळवणूक करीत असल्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. यासंदर्भात अनेक संस्था, संघटना तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करीत आहेत. तरीही आपण कोणकोणते डेकोरेटर नेमले आहेत. त्यांना कोणते निकष लावले आहेत, मनपाचे त्यांच्यावर नियंत्रण आहे की नाही याबाबत शंका वाटत आहे. तरीही याबाबत गंभीर दखल घ्यावी.
एकतर मनपाच्या वतीने शिवाजी पार्क मधील सर्व मंडपाचा खर्च उचलावा किंवा सर्व सबंधित डेकोरेटर्स साठी नियमावली तयार करून कमीत कमी दर आकारणी करावी अन्यथा संघटनेला सर्व आयोजकांना सोबत घेवून आंदोलन करावे लागेल.
अशी मागणी " भीम आर्मी " चे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment