सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी):- राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यात सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांची बदली बृहन्मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून झाली आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव स्वप्निल बोरसे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. सोलापूरचे नवे अपर पोलीस अधीक्षक म्हणून मुंबईच्या सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर हे येत आहेत. यावलकर यांनी यापूर्वी सोलापूर ग्रामीण पोलीस दलात डीवायएसपी म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे सोलापूरच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. याचा फायदा त्यांना अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना निश्चितच होईल.
त्याचबरोबर सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून काम पाहिलेल्या कविता नेरकर यांची बदली अंबेजोगाई येथून पोलीस अधीक्षक सायबर विभाग मुंबई येथे तर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे झाली आहे. अचानक झालेल्या या बदल्यांमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment