सारा न्यूज नेटवर्क -
प्रदेश अध्यक्ष सादिक शेख लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
सोलापूर (प्रतिनिधी ) :- जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून सोलापूर शहरातील वंचित पीडित अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त त्याचबरोबर सोलापूर शहरातील मूलभूत प्रश्नांना घेऊन सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी युवा पत्रकार सादिक शेख यांनी मानवाधिकार संरक्षण संघटनेची स्थापना केली असून या संघटनेच्या माध्यमातून सोलापूर शहरातील सार्वजनिक प्रश्न आणि अडचणी प्रशासन दरबारात मांडण्याचे काम मानवाधिकार संरक्षण संघटना करीत आहे सोलापूर शहरातील मूलभूत प्रश्न प्रशासन दरबारात मांडत आहे सोलापूर शहरातील महालक्ष्मी नगर 67 पेठ, सत्यसाई नगर,चिस्ती नगर शहर हद्दवाढ मजरेवाडी या तिन्ही परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून शेकडो नागरिक राहत आहे.
या तिन्ही परिसरात नागरी सुविधा म्हणून पिण्याच्या पाण्याची कुठलीही सुविधा नाही.
त्या परिसरात बोरवेल व इतर ठिकाणचे पाणी पिऊन अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सोलापूर महापालिकेला मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने गेल्या तीन महिन्यापासून या तिन्ही परिसरात पिण्याच्या पाण्याचे नवीन पाईपलाईन करून द्या म्हणून पाठपुरवठा सुरू आहे.
परंतु महापालिका प्रशासनाने या तिन्ही परिसरावर दुर्लक्ष केले असल्याचे चित्र दिसून येत आहे म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या शिष्ट मंडळाच्या बैठकीत महालक्ष्मी नगर, चिस्ती नगर , सत्यसाई नगर या तिन्ही परिसरात पाणीची सुविधा व्हावी म्हणून चर्चा करण्यात आली.
त्या चर्चा दरम्यान संघटनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते या तिन्ही परिसरात पाण्याच्या पाणी संदर्भात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची ग्वाही दिली होती. व आंदोलन देखील केले होते.
गेल्या तीन महिन्यापासून महापालिकेला सातत्याने पाठपुरवठा सुरू असताना काल महालक्ष्मी नगर, सत्यसाई नगर, चिस्ती नगरच्या लोकांना नवीन पाईपलाईन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून करून द्यावी म्हणून 600 नागरिकांची सह्यांचा पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानवअधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने पोस्ट ऑफिस द्वारे पाठवण्यात आला आहे.
त्या परिसरात मानव अधिकार संरक्षण संघटनेचे सोलापूर शहर संपर्कप्रमुख परवेज मुल्ला, सलीम शेखउमर शेख, इरफान मुजावर यांनी या सह्यांची मोहिम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले.
*पाणी प्रश्नावर सादिक शेख घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट*
सोलापूर शहरातील सत्यसाई नगर चिस्ती नगर महालक्ष्मी नगर च्या नागरिकांना पाणी पिण्यासाठी महापालिका अनेक वेळ निवेदन आंदोलन करून देखील ठोस उपाययोजना करत नसल्याने मानव अधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख आक्रमक झाले असून सर्वसामान्य माणसाला महानगरपालिका सोलापूर पिण्यासाठी पाणी देत नसल्याने आपण ही बाब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार असल्याचे सांगितले आहे.
यावेळी मानव अधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सादिक शेख, सोलापूर जिल्हा अध्यक्ष (आरोग्य विभाग) अकबर शेख, सोलापूर शहर (महिला विभाग) अध्यक्ष आयशा सय्यद, सोलापूर शहर उपाध्यक्ष अजहर बिजापुरे, शहर संपर्कप्रमुख परवेज मुल्ला,सलीम शेखउमर शेख, इरफान मुजावर, उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment