सारा न्यूज नेटवर्क -
संविधान दिन-शहीद दिन-कायदा दिन.
सोलापूर (प्रतिनिधी) :- कायदा व सुव्यवस्था याचे संरक्षण करणारे पोलीस अधिकारी बांधव व भगिनी यांना रोप शाल व गुलाबाचे फुल देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आले.
मातोश्री गिरजाबाई ढोबळे महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालय यांनी आज संविधान दिन व शहीद दिन याचे औचित्य साधून आगळावेगळा उपक्रम विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे घेतला . संविधान दिन व शहीद दिन असल्याने पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे संविधानाचे वाचन करून पोलिसांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुलाब पुष्प रोपे व शाल देऊन प्राचार्य डॉ. नदाफ मॅडम ,डॉ. पांढरे वासंती मॅडम, प्रा. जाधव रेशमा मॅडम. प्रा. माने मॅडम व साळुंखे मॅडम तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी शिक्षक महा एनजीओ फेडरेशनचे जिल्हा समन्वयक डॉ मनोज देवकर सर यांनी आदर व्यक्त केला.
प्रत्येक पोलीस बांधवांना व भगिनी यांना एक रोप देऊन त्यांचा सन्मानपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात आले तसेच त्यांना तसेच त्यांना आदरपूर्वक मानवंदना सॅल्यूट ही देण्यात आले विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई जगदाळे सर पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अजय पोफळभट, ठाणे अंमलदार सुनील मोतेकर, तसेच अर्जुन चौधरी पोलीस बांधव व भगिनी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment