Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, March 9, 2024

सांगलीच्या व्यक्तीने 37 लाखांचे पोकलेन भाड्याने घेत फसवले..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सांगलीच्या व्यक्तीने 37 लाखांचे पोकलेन भाड्याने घेत फसवले.. 

सोलापूर (प्रतिनिधी ) :- दरमहा 2लाख 10 हजार रुपये भाडे देतो असे आमिष दाखवून सांगली येथील सतीश चव्हाण यांनी सोलापूर येथील सुनील राणा जगताप (वय 40) यांचे 35 लाख रुपयांचे पोकलेन मशीन आणि 2लाख रुपये किमतीचे ब्रेकर भाड्याने मागणी करून फसवणूक केली. त्याची फिर्याद सुनील जगताप यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

2 नोव्हेंबर 2023 रोजी सतीश चव्हाण यांनी सुनील राणा जगताप यांच्या मालकीचे अंदाजे 35 लाख रुपये किमतीचे पोकलेन मशीन व अंदाजे 2 लाख रुपये किमतीचे ब्रेकर भाड्याने मागणी केली दरमहा 2 लाख 10 हजार रुपये भाडे देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर एसआर पी एफ ग्रुप नंबर 10 विजापूर रोड येथील रोडच्या कडेला मोकळ्या मैदानात 7  नोव्हेंबर 2023 रोजी ट्रेलर पाठवून दिले पोकलेन मशीन व ब्रेकर लोड करून दिले. तेव्हापासून ते आजपर्यंत सतीश चव्हाण यांनी पोकलेन मशीन व ब्रेकर कोठे आहे याची माहिती दिलेली नाही. शिवाय पोकलेन व ब्रेकर चे ठरलेले भाडे देण्याची त्यांनी टाळाटाळ केली त्यामुळे अंदाजे 37 लाख रुपये किमतीचे पोकलेन  मशीन व ब्रेकर घेऊन जाऊन सतीश चव्हाण यांनी विश्वासघाताने फसवणूक केल्याची फिर्याद जगताप यांनी दिली आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment