Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, March 16, 2024

राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन तर्फे करण्यात आला कर्तुत्वान"आदर्श माता" भगिनींचा गौरव.

 


सारा न्यूज नेटवर्क - 

राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन तर्फे करण्यात आला कर्तुत्वान"आदर्श माता" भगिनींचा गौरव.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तसेच राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त समाजातील कर्तुत्वान महिला भगिनींचा 'आदर्श माता पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. 


हा गौरव सोहळा रविवारी जुळे सोलापुरातील गणेश सोसायटी गणेश मंदिरात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. याप्रसंगी प्रसिद्ध लेखिका, प्राध्यापिका नसीमा पठाण, कवयित्री तथा शिक्षिका रिंकू जाधवर-धस,संस्थेचे उपाध्यक्ष प्रेमचंद मेने,ज्योती मेने,शैलेश मोहीकर,अरुण धुमाळ,एडवोकेट आनंद सागर डॉ.मनोजकुमार देवकर,बालाजी पाठक,अश्विनी कुंभार,अपर्णा पाठक,अनिता पाटील पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेतर्फे कलावती जमखंडीकर,विद्या चौगुले,सुमंगल हडपद,अर्चना ठाकूर,मंगल कोरे या महिला भगिनींचा सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ, बुके तसेच एचबीसी कंपनीतर्फे एक महिन्याच्या कॅल्शियम टॅबलेट देऊन त्यांना"आदर्श माता" याने गौरविण्यात आले.  

महिलांनी आपल्या जीवनात धाडसी वृत्ती दाखवून स्वतःची क्षमता ओळखून वेगळ्या वाटेने जावे जेणेकरून कुटुंबासह समाजाच्या सर्वांगीण विकास होईल असे मत प्रसिद्ध लेखिका प्राध्यापिका नसीमा पठाण व  शिक्षिका रिंकू जाधवर- धस यांनी मनोगतातून व्यक्त केले. या गौरव सोहळ्यास शैलेश मोहीकर व सिद्धार्थ भडकुंबे यांनी नारीशक्ती वर आधारित आणि भक्ती गीते हिंदी,मराठी भाषेतून गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. 'सेवा,स्वावलंबन, समर्पण हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे .

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन पार पाडले.शैलेश मोहीकर यांनी गणेश स्तवन सादर केले.संस्थेच्या अध्यक्षा प्रांजली मोहीकर यांनी अतिथींचा परिचय करून दिला तसेच फाऊंडेशनचा नेमका उद्देश सांगून , सत्कारमूर्तींच्याबद्दल त्या म्हणाल्या की, आपण अशा पाच महिलांचा सन्मान करत आहोत ज्या  स्वतः शिकलेल्या  नाहीत पण या महिला धुणी-भांडी करून,पोळ्या लाटून ज्यांनी स्वतःच्या मुलांचे उत्तमपणे शिक्षण पूर्ण केले आहे.

अशा पाच महिलांना आपण "आदर्श माता" या पुरस्काराने सन्मानित करीत म्हणून आहोत असे सविस्तर मनोगतरूपी विचार त्यांनी मांडले व महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास हेमलता नारायणकर,राजशेखर पाटील, उमा तम्मनवर,राहुल उंब्रजकर, अमर काळे, सोसायटीचे चेअरमन प्रकाश कुलकर्णी यांचीही विशेष उपस्थिती होती. समाजसेवक  परमेश्वर माळगे यांचे या कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमात कुमारी श्रावणी दिनेश उमाटे हिने भरतनाट्यमची बहारदार नृत्यकला सादर करून सर्वांची मने जिंकले.यावेळी एचबीसी कंपनीच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून रक्तातील साखर तपासणीचे मोफत शिबीरही संपन्न झाले.या शिबिराचा असंख्य महिलांनी लाभ घेतला. सदर गौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन बालाजी पाठक यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले.नारीशक्तीचा जागर सोळाप्रसंगी राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनचे मान्यवर पदाधिकारी व महिला भगिनींसह गणेश सोसायटीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्थेच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment