Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, March 20, 2024

व्ही. व्ही. पी. अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला दिन साजरा..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

व्ही. व्ही. पी. अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला दिन साजरा.. 

 सोलापूर (प्रतिनिधी) :- व्ही. व्ही. पी. अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, उद्योजिका चंद्रिका चौहान, शुभांगी बुवा, देवयानी किनगी, अनुराधा कदम, संस्था संचालिका संगीता देशमुख, संचालिका अनिता चव्हाण, प्रा. प्रीती देशमुख, प्रा. अनुराधा देशमुख, डॉ. ऐश्वर्या चव्हाण, प्राचार्य डॉ. उमेश मुगळे, डॉ. एस. एन. चव्हाण यांची उपस्थिती होती.

यावेळी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी कर्तृत्ववान महिलांच्या पाठीशी घरातील व समाजातील पुरुष मंडळीने खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. याप्रसंगी चंद्रिका चौहान, अँड. अनुराधा कदम, अँड. देवयानी किनगी, शुभांगी बुबा यांच्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यांना महाविद्यालयाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष डॉ प्रा. जी. के. देशमुख, संस्थापक सचिव अमोल नाना चव्हाण, संस्था संचालक इंजि.मधुकर कटकदौंड यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी प्रा. अर्चना मेटकरी, प्रा. कृपांजली भांगे, प्रा आश्विनी ढवळे, प्रा. संजना आवटे, प्रा स्नेहल मांजरे, प्रा. सानिकी घंटे, प्रा. रेखा विरादार, प्रा. सुप्रिया उमदी, प्रा. भवानी गुडगुपल्ली, प्रा. अनुराधा देशमुख यांर्न परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. अश्विनी यांनी केले. 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment