Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, March 13, 2024

परिवर्तन फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सत्कार..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

परिवर्तन फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सत्कार.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- परिवर्तन फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिनाचे निमित्ताने महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी काँग्रेस कमिटीचे शहर महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलोंढे ह्या होत्या. प्रमुख उपस्थिती म्हनुन शिवसेना महिला प्रमुख जयश्री पवार हे होत्या. 


परिवर्तन फाउंडेशन करत असलेल्या विविध कार्याची माहिती नसीमा शेतसंधी यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लैला जमादार यांनी केले. 

या वेळीं महिलांना फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशपाक शेख रफिक बागवान इलियास बिजापूरे, अहमद कोतवाल, इकबाल शेख, बुर्हाणकाजी , अनवर काजी, माजीद बागवान, सुनिता  गायकवाड ,रमेजा इनामदार, भारती मानसावले संगीता क्षीरसागर रेशमा तलफदार सायरा शेख शेहनाज मुजावर राईसा पठाण, विजयालक्ष्मी त्यारला,शालिनी त्यारला, सुप्रिया देशमुख,विजया कांबळे,शहनाजबी शेख, आदी उपस्थित होते. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment