सारा न्यूज नेटवर्क -
नगरसेविका,दिपालीताई यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेश भगत यांनी विशेष कार्यकारी अधिकारी यांचा शाल पांघरून केला वाढदिवस साजरा.!
ठाणे(प्रतिनिधी)दिवा :- आपल्या सहकाऱ्यांना प्रेरणा मिळावी त्यांच्यात कामाचा उत्साह वाढावा हा आदर्श रमाकांत मढवी (मा.उपमहापौर/दिवा शहर शिवसेना प्रमुख) यांच्याकडुन घेऊन, सौ.दिपालीताई भगत (मा.नगर सेविका) आणि उमेश भगत (शिवसेना,दिवा पूर्व विभाग प्रमुख) हे दाम्पत्य नेहमीच आपल्या सहकाऱ्यांच्या सुखा दु:खात सहभागी होत असतात.याचीच प्रचिती सोमवार दि.4/मार्च 2024 रोजी,आपले विश्वासु,कामसु आणि प्रमाणिक असलेले सहकारी तथा *महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी,सागर पवार* यांचा *मा.नगर सेविका,सौ.दिपालीताई भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेश भगत,विभाग प्रमुख यांनी पवार यांच्या अंगावर 'शाल पांघारून आणि केक कटींग' करून केला उत्साहात वाढदिवस साजरा!*
प्रसंगी,उमेश भगत आणि दिपालीताई भगत यांचे निकटवर्तीय सहकारी *सूर्यकांत कदम (शिवसेना,दिवा पूर्व उपविभाग प्रमुख) आणि विविध वॉर्डातील नरेंद्र पाटील(शाखाप्रमुख),रविंद्र परब (शाखाप्रमुख),संतोष पेंढारी (शाखाप्रमुख)तसेच कार्यालय प्रमुख,सचिन रोकडे* आणि सागर पवार यांचा चहाता वर्ग तथा दिपालीताई यांच्या शाखेचे निष्ठावान कार्यकर्ते राकेश चव्हाण,गणेश साहु,बबनराव शिरोडकर,अवधूत पाटील,राहुल भगत,अक्षय अडवलकर,प्रतिक आयरे,श्रीकांत गोरे,विजय शेट्टे,संजय बालम इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment