सारा न्यूज नेटवर्क -
इको नेचर क्लबच्या माध्यमातून चिमण्यांचे घरटे बनवण्याची कार्यशाळा संपन्न.
सोलापूर (प्रतिनिधी) :- आज जागतिक चिमणी दिवस जागतिक चिमणी दिवस या दिनाचे औचित्य साधून सोरेगाव येथील अनाथ बालक आश्रम येथे चिमण्यांचे घरट्यांचे बनवणे याचे कार्यशाळा संपन्न झाली.
आश्रमातील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम प्रमाणे चिमण्यांची घरटी बनवली व प्रत्येक झाडाखाली व छताखाली घरटी लावली.
आश्रमातील उपस्थित सर्व विद्यार्थी यांना, पर्यावरण प्रेमी मुख्य प्रशिक्षक प्रवीण जेऊरे, डॉ मनोज देवकर, बालकाश्रम चे सुवर्णा बेली ताई, सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, इंजिनिअर रवी रणदिवे आदींनी उपस्थित विद्यार्थ्यांना चिमण्यांचे घरटे बनवण्याचे प्रशिक्षण दिले. व त्यांच्या कडून घरटे बनवुन घेतले.
मागेल त्याला चिमण्यांचे घरटे देण्यात येणार आले तसेच जलपात्रही वाटप करण्यात आले. या मागचा उद्देश एकच की निसर्गाचा समतोल साधावा व आपल्या निसर्गातील पक्षी वाचवणे हा आहे. चिमणी आणि इतर पक्षांना पाण्याची सोय करणे जलपत्र वाटप करणे झाडे लावणे कारण झाड हे मूळ त्यांचे घर आहे परंतु आपल्या परीने हे घरटे तयार करण्याचा प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहे.
एक घरटं चिऊताई साठी हा उपक्रम गेली सहा वर्षे झाले सातत्याने चालू आहे. शेवटी सर्व विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी घोषणा दिल्या.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment