सारा न्यूज नेटवर्क -
सिध्देश्वर वनविहार येथे जागतिक वन्यजीव दिन साजरा..
पोलीस उपआयुक्त डॉ.दीपाली काळे यांच्या हस्ते घार (black kite) व होला (Dove) या पक्षांना केले निसर्गात मुक्त..
सोलापूर (प्रतिनिधी) :- दरवर्षी 3 मार्च दिवस हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जातो. वन्यजीवन व त्यांचे महत्व या बाबत जनसामान्यांना माहिती देणे, त्यांच्या संरक्षणासाठी जनजागरण करणे हा उद्देश असतो.
सिद्धेश्वर वनविहार येथील वन्यजीव संक्रमण उपचार केंद्र सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकिणाहून उपचारासाठी येणाऱ्या वन्यजीवांसाठी उपाययोजना केली आहे. वनविभागाच्या उपचार केंद्रात दाखल असलेले पक्षी यांचेवर उपचार करून तंदुरुस्त झालेल्या घार (black kite) व होला (Dove) या पक्षांना निसर्गात मुक्त करण्यासाठी आज सोलापूर वनविभागाचे मा. उपवनसंरक्षक श्री धैर्यशील पाटील व सोलापूर शहर पोलिस चे मा. पोलीस उपआयुक्त डॉ.दीपाली काळे मॅडम यांच्या हस्ते निसर्गात मुक्त करण्यात आले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment